आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील योगराज दु:खी, म्हणाले- युवराजने लग्नात साधा कुर्ता-पायजमा नाही दिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग आपल्या मुलावर नाराज आहेत. युवीने लग्नात आपल्याला साधा कुर्ता-पायजमाही दिला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. - Divya Marathi
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग आपल्या मुलावर नाराज आहेत. युवीने लग्नात आपल्याला साधा कुर्ता-पायजमाही दिला नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली.
चंडीगड- मुलगा युवराजच्या लग्नात सामील न झाल्याचे दु:ख वडील योगराज सिंग यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत आहे. शनिवारी जेव्हा त्यांच्याशी बोलणे झाले तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनही ते स्पष्टपणे जाणवत होते. तसेच युवराजने एका बाबाजवळ जाऊन लग्न करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे यावरूनही त्यांनी चांगलेच फटकारले. योगराज म्हणाले, मुलगा युवीने माझ्यासाठी साधा कुर्ता सुद्धा दिला नाही तर दुसरीकडे गुरुद्वाराच्या डे-यात गाड्यांची लाईन लावली होती...
- क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस हेजल कीच यांचे मागील आठवड्यात लग्न झाले.
- याबाबत युवीचे वडील योगराज म्हणाले, भले ही मी युवराजच्या लग्नात नसेल गेलो पण माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच त्याच्यासोबत आहे आणि राहील.
- मी लग्नाला न गेल्यामुळे आमच्या नात्यात कोणतेही कटुताही नाही. युवी माझा मुलगा आहे आणि हेजल सून आहे.
- दोघेही माझा मनापासून सम्मान करतात. लग्नात न जाण्याचा निर्णय माझा होता. मा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. बस दोघांचा विवाह आनंदात पार पडला यातच मला समाधान मिळाले.
- योगराज म्हणाले, मी बाबा दीप सिंगजी यांना प्रार्थना केली होती की, मला हिम्मत दे. भावनेच्या भरात माझे पाय युवीच्या लग्नाकडे वळू नये म्हणून. पण बाबांच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक पार पडले.
माझ्यासाठी साधा कुर्ताही दिला नाही आणि डे-यात गाड्यांची लाईन लागली होती...
- डेरे वाले बाबांबाबत बोलताना योगराज म्हणाले, मी हैराण आहे की, आजकल शिकले सवरलेले लोक डेरे वाले बाबांच्या चक्करमध्ये फिरत राहतात. मला कळत नाही यांची विचार करण्याची शक्ती गेली तरी कुठे आहे?
- यापेक्षा अशिक्षित लोक परवडले. ज्यांना चुकीचे आणि बरोबर काय हे नेमके कळते. मी दुस-याबाबत काय बोलणार, जेव्हा मीच या गोष्टी भोगतोय, माझे कुटुंबिय सर्व या भानगडीतच अडकले आहेत.
- ज्या युवराजला मी माझ्या हाताने भरले, खाऊ घातले, हाता-खांद्यावर खेळवले आणि सर्वात म्हणजे 16 वर्षापर्यंत क्रिकेट खेळायला शिकले. त्या युवराजने मला लग्नात साधा एक कुर्ता पायजामा सुद्धा दिला नाही. दुसरीकडे, त्याने डे-यात चार चार गाड्याची लाईन लावली होती.
काय बाबाने युवीला किक्रेट खेळायला शिकवले?
- योगराज म्हणाले, खरं तर मला हे जाणून घ्यायचे आहे की ज्या बाबाजवळ युवी जातो त्या बाबाने त्याला क्रिकेट खेळायला शिकवले? काय त्या बाबाने त्याचा कॅन्सर ठीक केला. युवराज म्हणतो, बाबांच्या आशीर्वादामुळे माझे सर्व काही चालले आहे व क्रिकेटही खेळत आहे.
- मी लोकांना विचारतो की, ज्यांना या ग्रंथातून जे ज्ञान मिळाले नाही, संस्कार समजले नाहीत ते लोक बाबांजवळ जाऊन नेमके शिकतात तरी काय?
- मी या सर्व बाबांबाबत जाणून आहे की, ते किती खरे आहेत आणि किती खोटे.
- धर्माच्या नावाखाली लोकांना आकर्षित केले जाते याबाबत योगराज म्हणाले, माझे म्हणणे आहे की, असा दिखावा करून काहीही होत नाही. जर तुम्ही मनातून भक्ती केली तर इतर काही करण्याची गरज नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, योगराज युवराजच्या लग्नात का सामील झाले नाहीत....
बातम्या आणखी आहेत...