आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Is Seeking The Blessings Of \'The God\' Sachin

सचिनच्‍या फिरकीपुढे युवराजसिंग फेल, बाद झाल्‍यानंतर सचिनचे धरले पाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटची पंढरी म्‍हणून ओळखल्‍या जाणात्‍या 'लॉर्डस'च्या द्विशताब्दी निमित्त एमसीसी इलेव्हन व वर्ल्ड इलेव्हन यांच्यात शनिवारी सामना खेळला गेला. शेष विश्व एकादशकडून खेळणा-या युवराजसिंगने शतकीय खेळी केली. सचिनच्‍या गोलंदाजीवर षटकार खेचणारा युवराज सिंग त्‍याच्‍या दुस-या चेंडूवर झेलबाद झाल्‍याने युवराजने सचिनचे पाय धरले. मास्‍टर ब्‍लास्‍टरनेही युवराजची पाठ थोपटत आशिर्वाद दिले.
सचिन एमसीसी इलेव्हनचे नेतृत्व केले तर वर्ल्ड इलेव्हनचे नेतृत्व शेन वॉर्नने केले आहे.
सचिनने दिल्‍या युवराजला शुभेच्‍छा

युवराजने या सामन्‍यामध्‍ये 6 षटकार आणि 8 चौकारांच्‍या सहाय्याने शतकी पारी खेळली. त्‍यावेळी सचिन तेंडुलकरने युवराजसोबत हस्‍तांदोलन करुन त्‍याला शुभेच्‍छा दिल्‍या होत्‍या. शेष विश्‍व एकादश जेव्‍हा पाच विकेटवर 68 धावा बनवून खेळत होते अशा परिस्थितीत युवराजसिंगने शतकी खेळी करुन संघाला सावरण्‍याचा प्रयत्‍न केला होता.
सामन्‍याचा निर्णय
ऑस्‍ट्रेलियाच्‍या ऍरोन फिंचने झळकवलेल्या नाबाद 181 धावांच्या बळावर एमसीसीने शेष विश्‍व एकादशला सात विकेटने पराभूत केले. शेष विश्‍व एकादशने प्रथम फलंदाजी करताना 294 धावा केल्‍या होत्‍या. सचिन तेंडुलकरच्‍या नेतृत्‍वाखाली लढणा-या एमसीसी संघाने 45.5 षटकांमध्‍येच 3 विकेटच्‍या मोबदल्‍यात 296 धावा काढून विजय मिळविला.

संक्षिप्त धावफलकः
शेष विश्व एकादश:

50 षटकांत 7 बाद 293 (गिलख्रिस्ट 29, सेहवाग 22, पीटरसन 10, युवराज 132, कॉलिंगवूड 40, सिडल नाबाद 33, अवांतर 23, अजमल 4-45, ब्रेट ली 2-55, सचिन 1-33).
एमसीसी: 45.5 षटकांत 3 बाद 296 (145 चेंडूत नाबाद 181, तेंडुलकर 44, लारा 23, चंदरपॉल नाबाद 37, कॉलिंगवूड 2-25, मुरलीधरन 1-55).
(फोटोओळ- सामन्‍यादरम्‍यान सचिनचे चरण स्‍पर्श करताना युवराजसिंग)
पुढील स्‍लाइडवर पाहा, सामन्‍यादरम्‍यानची काही निवडक छायाचित्रे...