आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटशिवाय पोहणे आणि रिव्‍हर राफ्टिंगचा शौकिन आहे युवराजसिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिटनेस संदर्भात अत्‍यंत जागरुक असलेला क्रिकेटपटू युवराजसिंग क्रिकेटव्‍यतिरिक्त ब-याच खेळात निपूण आहे. पोहणे, घोडदौड, रिव्‍हर राफ्टिंग, आइस बाथ आदी त्‍याचे आवडीचे खेळ आहेत.

युवराजसिंग शारिरीक तंदुरुस्‍तीसाठी नियमित व्‍यायाम करत असतो. दररोज दोन तास फलंदाजी, एक तास गोलंदाजी आणि अर्धा तास क्षेत्ररक्षण असा त्‍याचा नियमित सराव असतो. त्‍याच्‍या या फिटनेसमुळेच एका प्रतिष्ठित 'मॅन्‍स हेल्‍थ' या मासिकाने त्‍याचे छायाचित्रे जानेवारी 2013 च्‍या मुखपृष्‍ठावर छापले होते.