आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh May Not Be Part Of Team India For World Cup. Top Indian Cricketers To Watch For World Cup

विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा; धोनीकडे नेतृत्त्व, जडेजाला संधी तर युवराजला डावलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विश्वचषक-2015 साठी टीम इंडियाची घोषणा झाली. विश्वचषकासह इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरोधात होणार्‍या तिरंगी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड झाली.

मुंबईत झालेल्या बैठकीत 15 क्रिकेटपटूंचा संघ निवडण्यात आला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया विश्वचषकाच्या मैदानावर उतरणार आहे. टीममध्ये युवराज सिंहला संधी मिळाली नाही. रवींद्र जडेजाला निवडकर्त्यांनी ग्रिन सिग्नल दिला आहे. जडेजा पुढील 10 दिवसात फिट होऊन विश्वचषकात खेळेल असे निवडकर्त्यांनी सांगितले आहे. जडेजाच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे जडेजा खेळेल की नाही, अशी साशंकता व्यक्त केली जात होती.
विश्वचषकासाठी टीम इंडिया...
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, आर अश्विन, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर, उमेश यादव, इशांत शर्मा.
युवराजला घेण्यास महेंद्रसिंह धोनीचा होता नकार?
बीसीसीआयच्या मुंबईतील कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, सबा करीम, विक्रम राठोड आणि राजेंद्र हंस आदी निवडकर्ते उपस्थित होते. रॉजर बिन्नी बैठकीला थोडे उशिरा पोहोचले. कर्णधार धोनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज सिंहला टीम इंडियात घेण्यास धोनी सहमत नव्हता. मात्र, निवडकर्त्यांनी युवीला संघात घेण्याची मागणी केली होती. युवराजला संघात संधी मिळायला हवी, माजी क्रिकेटर बिशन सिंह बेदी यांनी जोर लावला होता. दुसरीकडे, मनोज प्रभाकर यांनी ऑलराउंडर अक्षर पटेल हा रवींद्र जडेजापेक्षा निपुण असल्याचे सांगितले होते. मात्र, दोघांना पर्याय म्हणून युवराज सिंहकडे पाहाता येणार नसल्याचेही प्रभाकर यांनी म्हटले होते.
करारबद्ध केल्या जाणार्‍या 30 खेळाडूंच्या यादीतूनही युवराजला वगळण्यात आले होते. युवराजने हरियाणा, महाराष्ट्र सौराष्ट्रविरुद्ध लागोपाठ शतके झळकावले होते. त्यामुळे विश्वचषकासह तिरंगी मालिकेसाठी युवराज सिंह याचा संघात समावेश होइल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
दरम्यान, येत्या 14 फेब्रुवारीपासून एकदिवसीयच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे.
18 जानेवारीपासून तिरंगी मालिकेला सुरुवात होईल. यात भारतासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाचा समावेश आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडिया विश्वचषकासह तिरंगी मालिकेच्या मैदानावर उतरणार आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून याचा, विश्वचषक-2015: टीम इंडियाची पहिली लढत पाकिस्तान विरोधात...