आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Meet His Guru Baba Ram Singh Ji In Chandigarh

विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान न मिळालेला Yuvi पोहोचला गुरूच्या चरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - युवराज सिंग आणि त्याचे गुरू संत बाबा राम सिंग.
चंदिगड - रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यासाठी चंदिगडला आलेला युवी बुधवारी हंसालीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दसेहडामध्ये गुरूच्या दर्शनासाठी गेला होता. याठिकाणी त्याचे गुरू संत बाबा राम सिंगजी यांच्या पायाजवळ तो बसला होता. विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाल्यानंतर युवराज प्रथमच समोर आला आहे. त्याने स्वतः फेसबूकवर हा फोटो अपलोड केला, पंजाबच्या शांत शेतांमध्ये गुरुजींच्या पायाजवळून उठण्याची इच्छा होत नसल्याचे त्याने पोस्ट केले.

काही दिवसांपूर्वीच 2015 मध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी 30 संभाव्य खेळाडुंच्या संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर रणजीतील युवराजच्या कामगिरीमुळे अंतिम 15 जणांमध्ये युवराजच्या नावाचा प्रवेश केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली. पण तसे झाले नाही. युवराज बरोबरच गेल्या विश्वचषक स्पर्धेतील वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान आणि हरभजन सिंह यांच्या नावाचा समावेशही करण्यात आला नव्हता. विशेष म्हणजे गेल्या विश्वचषक स्पर्धेत युवराज मालिकावीर ठरलेला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, युवराज सिंगच्या गुरूंचा PHOTO...