आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल- 7 काउंटडाऊन : आता वीरू, युवीवर नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 क्रिकेट स्पर्धेला 16 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत आता वीरेंद्र सेहवाग आणि युवराजसिंगवर सर्वांची नजर असणार आहे. वीरू सध्या टीम इंडियातून बाहेर आहे, तर नुकताच युवीने वर्ल्डकप टी-20च्या अंतिम सामन्यात निराशाजनक खेळी करून नव्या चाहत्यांचा असंतोष ओढावून घेतला आहे.

आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वीरेंद्र सेहवागने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यंदाच्या सत्राता वीरू किंग्ज इलेव्हन पंजाब आणि युवराजसिंग रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणार आहे.

युवीच्या नावे एकही शतक नाही
युवराज सिंगला आक्रमक फलंदाजाच्या भूमिकेत पाहिले जाते. मात्र, आयपीएलमध्ये त्याला अद्याप एकही शतक झळकावता आले नाही. यात त्याचा 66 धावांचा सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे. युवीने गत सहा सत्रांत सहा अर्धशतकांसह 1475 धावा काढल्या आहेत. तसेच 29 विकेटही घेतल्या आहेत. युवीसाठी यंदाचे सत्र हे महत्त्वपूर्ण आहे. कारण यातूनच त्याला फॉर्मात येण्याची संधी आहे.

वीरूची 15 अर्धशतके : सेहवागने आयपीएलमध्ये एका शतकासह 15 अर्धशतक ठोकली आहेत.तसेच त्याने आयपीएल-4 मध्ये 119 धावांची झंझावाती खेळी केली होती.

युवीची कामगिरी
2008 (299 धावा, 3 विकेट)
2009 (340 धावा, 6 विकेट)
2010 (255 धावा, 5 विकेट)
2011 (343 धावा, 9 विकेट)
2013 (238 धावा, 6 बळी)

वीरूची कामगिरी
2008 (406 धावा, 3 विकेट)
2009 (198 धावा)
2010 (356 धावा, 3 विकेट)
2011 (424 धावा)
2012 (495 धावा)
2013 (295 धावा)