आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh Sold At 14 Crore Rupees In Ipl Auction 2014

कॅन्‍सरवर विजय मिळवणारा युवराज ठरला \'सबसे बडा खिलाडी\', तब्‍बल 14 कोटींची लागली बोली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नशीब कसे बदलते, याचा नमुना प्रत्‍येकवर्षी आयपीएलच्‍या लिलावावेळी पाहायला मिळतो. भारतीय क्रिकेट संघाच्‍या बाहेर असणा-या युवराज सिंगने आयपीएलचे आता पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून तो सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.बोली सुरू होण्‍याअगोदर युवराज सिंगावर कोणी बोली लावेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. युवराजचा मित्र विराट कोहली आपल्‍या मैत्रीला जागला आणि युवराजला हीरो करून टाकले. बोली लावण्‍याअगोदर अशी चर्चा होती की, कोहली युवराजला आपल्‍या सोबत बंगळुरू संघामध्‍ये घेणार आहे. आपल्‍या स्‍टार कर्णधाराच्‍या इच्‍छेखातर विजय माल्‍या यांनी 14 कोटी रूपयांची बोली लावली व युवराजला आपल्‍या संघासाठी खरेदी केले.
2011 मध्‍ये पुणे वॉरियर्स या संघाने 8.28 कोटी रूपयामध्‍ये युवराजला खरेदी केले होते.
2011 मध्‍ये झालेल्‍या आयपीएलच्‍या सामान्‍यातील खेळाडूंच्‍या बोलीमध्‍ये युवराज सातव्‍या क्रमांकावर होता, या वर्षी मात्र युवराज सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोणाला केले युवराजने क्‍लीन बोल्‍ड