आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवीचा कॅन्सरविरुद्ध लढा पुस्तकरूपात; 12 डिसेंबरला ‘इन डिफरंट फॉर्म’चे प्रकाशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कॅन्सरवर मात करून भारतीय क्रिकेट संघात पुनरागमनासाठी जोरदार तयारी करीत असलेला युवराजसिंग आत्मकथा लिहितोय. त्याचा कॅन्सरविरुद्धचा पूर्ण लढा ‘इन डिफरंट फॉर्म’ शीर्षकाच्या रूपाने 12 डिसेंबर रोजी त्याच्या चाहत्यांच्या हाती येतोय. नवी दिल्लीतील रेड हाऊस प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करीत आहे.
विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवराजसिंग कॅन्सरच्या आजारामुळे गेले दीड वर्ष क्रिकेटपासून दूर आहे. अमेरिकेत त्याने कॅन्सरवर उपचार घेतले. विश्वचषकापासून ते कॅन्सरपर्यंतच्या प्रवासाने माझे जीवन बदलले, असे तो म्हणतो. मी सुरुवातीला आपल्या चुकांतून धडा घेऊन ज्युनियर खेळाडूंना सांगायचो, सल्ला द्यायचो. प्रसंगी त्यांना प्रोत्साहित करायचो. कॅन्सर झाल्यानंतर मला या आजारपणाचे गांभीर्य समजले. मी एका मोठ्या गटात सामील झालो. कॅन्सरची भीती काय असते हे मला समजले. मी माझ्या जीवनातील चढउतार सर्वांना सांगू इच्छितो. ज्या संस्थेने लान्स आर्मस्ट्राँगचे पुस्तक छापले, तीच संस्था माझे पुस्तकही प्रकाशित करीत आहे, याचा मला आनंद आहे, असे युवीने म्हटले.