फाइल फोटो – अन्य सहकारी खेळाडूंसोबत जहीर खान
नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरने 'प्लेइंग इट माय वे' आत्मचरित्रात
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यावर टीका केली. त्याचीच री ओढत झहीर खाननेही ग्रेग चॅपल यांच्याविरुध्द दंड थोपाटले आहेत. 2005-07 मध्ये चॅपल
आपले करिअर उध्वस्त करु इच्छित होते, असा आरोप झहीरने केला आहे.
काय म्हणाला झहीर खान ?
आतापर्यंत कसोटीमध्ये 311 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 282 विकेट टिपणा-या झहीरने म्हटले की, ग्रेग चॅपल त्यांचे विचार आमच्यावर लादत होते. त्यांच्या निर्णयाच्या विरोधात गेल्यास खेळाडूचे संघातील स्थान धोक्यात येत होते. त्यांच्या वर्तनामुळे मी कायम गोंधळून जात होतो.
दक्षिण आफ्रीकेविरुध्द जोरदार पुनरागमन
वेगवान गोलंदाज झहीर खानने म्हटले की, 2005 मध्ये चॅपलमुळे मी निराश झालो होतो, परंतु संघात पुनरामनासाठी खूप इच्छुक होतो. म्हणूनच मी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द संघात पुनरामन करु शकलो.
पुढील स्लाइडवर वाचा, राहुल द्रविड़ने चॅपलविरुध्द का दिली नाही प्रतिक्रिया...