आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zaheer Khan Launches Fitness Company In Mumbai On Eid

ईदच्या मुहूर्तावर झहीर खानने सुरु केला नवा बिझनेस, रेस्‍तरॉनंतर उघडले फिटनेस सेंटर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज झहीर खान याने रमजान ईदच्या मुहूर्तावर नवा बिझनेस सुरु केला आहे. झहीरने रेस्‍तरॉ बिझनेसमध्येही आपले नशीब आजमावले होते. त्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर आता झहीरने 'प्रो स्पोर्ट' नामक फिटनेस ट्रेनिंग आणि फिजियोथेरेपी सर्व्हिसेस कंपनी उघडली आहे. टीम इंडियाचे माजी फिजियो अँड्रयू लीपस आणि माजी फिटनेस ट्रेनर अॅड्रियन लेरॉक्स हे दोघे झहीरच्या नव्या फिटनेस व्हेंचरला योगदान मिळाले आहे.

झहीरने आपल्या 'प्रो स्पोर्ट'ची पहिली शाखा मुंबईतील लोअर परेलमध्ये सुरु केली आहे. 5000 स्क्वेअर फूट जागेत उभारण्यात आलेल्या स्पोर्ट्स फिटनेस सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या इक्विपमेंट्स आणि फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. झहीर भविष्यात आपल्या 'प्रो स्पोर्ट'च्या आणखी चार नव्या शाखा मेट्रो सिटीजमध्ये सुरु करणार आहे.
देशातील सर्व मेट्रो सिटीजमध्ये प्रो स्पोर्टच्या शाखा उघडण्याचा आमचा मानस आहे. त्यानंतर लहान शहरात आम्ही पाऊल ठेवणार आहे. 2015 पर्यंत दोन शाखा तर 2016 पर्यंत अनेक शाखा सुरु होतील, असे झहीरने सांगितले आहे. उल्लेखनीय म्हणजे 2005 पासून झहीर खान क्रिकेट व्यतिरिक्त आपला बिझनेसही सांभळताना दिसत आहे. झहीर खाने पुण्यात 'ZK's' नामक पहिला रेस्‍तरॉ सुरु केला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, झहीर खानच्या फिटनेस क्लब, रेस्तरॉ आणि स्पोर्ट्स लाउंजची छायाचित्रे...
(फाइल फोटो: ZK's स्पोर्ट्स लाउंजमध्ये उभा असलेला झहीर खान)
(टीप - सर्व फाइल फोटो)