आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहीर-ईशाचा मार्चमध्ये निकाह!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली । भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज ‘झॅक’ ऊर्फ जहीर खान व सिनेअभिनेत्री ईशा शर्वनी येत्या मार्च महिन्यात विवाहबद्ध होणार आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुुरू आहे. मैत्रीतून या दोघांचे सुत जुळले होते. जहीरच्या कुटुंबीयांनी या विवाहाला हिरवी झेंडी दाखवली आहे.
हॉलीवूड अभिनेत्री ईशा शर्वनी हिने पाच वर्षांपूर्वीच जहीर खानची विकेट घेतली होती. 2005 मध्येच या दोघांची भेट झाली होती. या भेटीतून त्यांच्यातील प्रेमाचा वसंत फुलला होता. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘किसना’या चित्रपटात ईशा शर्वनी हिने काम केलेले आहे.
दोघांसाठीही हे नवीन वर्ष लकी ठरलेले आहे. त्यामुळे आगामी मार्च महिन्यात या जोडीला विवाहबंधनात अडकवण्यासाठी जहीरचे कुटुंबीय प्रयत्नशील आहे. यासाठी मागील दोन दिवसांपासून जहीरच्या घरात या विषयावर जोरदार चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. जहीर सध्या ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर जहीर खानने भारतीय संघात पुनरागमन करताना ऑस्ट्रेलियात दौ-यात चांगली कामगिरी केली आहे.