आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजांना संधी मिळेना - जहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परदेश दौऱ्यावर जोपर्यंत गोलंदाजांना आपले मोठे योगदान देत नाहीत, तोपर्यंत गोलंदाजांना आपला ठसा उमटवता येणार नाही. भारतीय संघालाही परदेशातील कामगिरीचा इतिहास बदलता येणार नाही, असे प्रतिपादन भारताच्या मध्यमगती गोलंदाजीचा प्रमुख आधार असलेल्या जहीर खान याने व्यक्त केले. "पहिल्या डावात ३५०च्या पुढे मजल मारली की सामन्यावर नियंत्रण मिळवता येते, किमान मागे राहता येत नाही. परदेशात जेव्हा जेव्हा आपण चांगली धावसंख्या उभारली, तेव्हा तेव्हा आपण यशस्वी ठरलो होतो,'असेही तो म्हणाला.
मोठ्या प्रदीर्घ मालिकेत खेळताना तुमची दमछाक होते. त्या चे दडपण गोलंदाजांवर अधिक येते. ईशांत शर्मा ने लॉर्ड््स कसोटी जिंकून दिली आणि नंतर जायबंदी झाला. भारतासाठी तो मोठा धक्का होता."ड्यूक' चेंडूने सुरुवातीला खराब गोलंदाजी केल्या नंतरही सावरता येते. कारण तो चेंडू १०-१५ षटकांनंतरच स् विंग "डेड' (नरि्जी व) होऊन जातो. त्या मुळे कसोटीमध्ये कधी आक्रमण करायचे, कधी धावा रोखायच्या , कधी प्रतीक्षा करायची, ते कळले पाहि जे. "सपोर्ट स्टाफ'वरून सध्या नरि्माण झालेले वादळ अनावश्यक असल्या चे मतही जहीरने व्यक्त केले.

वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात ती गोष्ट ताणली गेली, असे जहीरला वाटते. तुम्हा ला सर्व तोपरी साहाय्य, मदत करण्यासाठी सपोर्ट स्टाफ असतो. तो आपापल्या परीने साहाय्य करीत असतो. मात्र, सरतेशेवटी आपले योग्य ते योगदान देण्या ची जबाबदारी ही प्रत्येकाची वैयक्ति क असते.