आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोलंदाजी सरावासाठी जहीर खान दक्षिण आफ्रिकेला रवाना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आघाडीचा वेगवान गोलंदाज जहीर खान फ्रान्समधील तंदुरुस्ती शिबिरानंतर आज दक्षिण आफ्रिकेत सरावासाठी रवाना झाला. आफ्रिकेत जहीर गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाचा सराव करणार आहे. याठिकाणचा सराव आटोपून या महिन्याअखेरीस तो परतेल. त्यानंतर दुलीप, इराणी करंडक व भारताच्या अन्य प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत जहीर खान खेळणार आहे.

गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून झहीर स्‍पर्धात्‍मक क्रिकेटपासून दूर आहे. खराब फॉर्म आणि सुमार गोलंदाजीमुळे त्‍याला संघातून डच्‍चू मिळाला होता. त्‍यानंतर त्‍याने आयपीएलमध्‍येही काही सामने खेळले. मात्र, आतंरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये त्‍याला परतता आले नव्‍हते.