आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात जहीर खानची ‘नवी इनिंग’ रविवारपासून .!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई
भारताचा वेगवान गोलंदाज जहीर खान एक यशस्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तर आहेच, त्याबरोबरच तो यशस्वी उद्योजकही आहे. पुण्यात बस्तान बसवताना त्याने लुल्लानगर परिसरात ‘झेड के’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते. पुण्याच्या वाघोली रोडवरील फिनिक्स मॉलमध्ये ‘झेड के’ची आणखी एक शाखा निघाली. येत्या रविवारी पुण्यातील रेस्टॉरंटमधील ‘स्पोर्ट्स बार’ची कल्पना ‘टॉस’ या नावाने प्रत्यक्षात साकारते आहे.

सबकुछ स्पोर्ट्स या कल्पनेने साकारलेल्या या बारला लंडनच्या लॉर्ड्स मैदानाचा ‘लूक’ आहे. जागतिक क्रीडाविश्वातील दिग्गज खेळाडूंचे पोस्टर्स आहेत. त्यात युसेन बोल्ट आहे, बोरिस बेकर आहे, राफेल नदाल आहे, रॉजर फेडरर आहे, फुटबॉलपटू वायने रुनी, बेकहॅम आहेत, मारिया शारापोवा आहे आणि भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कपिलदेव, युवराजसिंग आदींचे फोटो आहेत. ‘झेड के’मधील बॅन्वेट हॉलला फॉयर नाव देण्यात आले आहे, तर रेस्टॉरंटला फाइन डाइन असे संबोधण्यात आले आहे. रविवारी सकाळी आपला एकेकाळचा सहकारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याच्या उपस्थितीत नव्या कल्पनांचे जहीर अनावरण करणार आहे.

जहीर खानने दरम्यानच्या काळात स्वत:च्या फिटनेसवर अधिक मेहनत घेतली आहे. तो म्हणाला, ‘फ्रान्समध्ये मी प्रशिक्षणात फिटनेससाठी पहिला टप्पा पूर्ण केला. तेथील सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणादरम्यान मी बरेच काही साध्य केले. फिटनेस पूर्णपणे मिळवली. तब्बल सात किलो वजन घटवले’.
व्यवसायात जहीरला भाऊ, वडिलांची मदत

जहीर खान 2003 च्या सुमारास हॉटेल उद्योगात आला. त्याने पुण्यात लुल्लानगर येथे ‘जहीर खान्स’ (झेड के) हे रेस्टॉरंट सुरू केले. त्याचा भाऊ अनिस आणि वडील बाख्तियार खान त्याला मदत करतात. भाऊ अनिस याने हॉटेल व्यवस्थापनाचा ब्रिटनमध्ये जाऊन अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तो पूर्णपणे या उद्योगात आला आहे. जहीर खानने आपल्या क्रिकेटमधील लोकप्रियतेचा लाभ घेत रेस्टॉरंटच्या फ्रँचायझी देण्याची यापुढील योजना आहे. पुण्यात जहीर खानच्या या योजनेला सध्यातरी जोरदार प्रतिसाद मिळत आहे.