आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

31 वर्षांनी झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर विजय, भारताला मिळाली वनडेची टॉप रँकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विजयानंतर झिम्बाब्वेच्या उत्सेयाला शुभेच्छा देताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क.)

हरारे - एल्टन चिगुंबुराच्या नाबाद 52 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. हरारे स्पोर्टस् क्लबमध्ये झालेल्या या वन डे सामन्यात झिम्बाब्वेने 3 धावांनी विजय मिळवत ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयाचा 31 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पराभवामुळे भारतीय संघ आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

टीम इंडिया टॉपवर
इंग्लंडवर सलग दोन सामन्यात विजय मिळवल्याने आणि ऑस्ट्रेलियाच्या झिम्बाब्वेकडून झालेल्या आश्चर्यकारक पराभवामुळे भारतीय संघ वन डे क्रमावारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका दुस-या तर ऑस्ट्रेलिया तिस-या स्थानावर आहे.
वन डे रँकिंग...
1. इंडिया - 114 रेटिंग
2. साउथ अफ्रीका - 113 रेटिंग
3. ऑस्ट्रेलिया - 111 रेटिंग
4. श्रीलंका - 111 रेटिंग
5. इंग्लंड - 106 रेटिंग
6. पाकिस्तान - 100 रेटिंग
7. न्यूझीलंड - 98 रेटिंग
8. वेस्ट इंडिज - 96 रेटिंग
9. बांग्लादेश - 69 रेटिंग
10. झिम्बाब्वे - 58 रेटिंग

31 वर्षांनी पराभव
झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर 31 वर्षांनी विजय मिळवला आहे. यापूर्वी 9 जून 1983 ला नॉटिंगहम मध्ये झालेल्या वनडे सामन्यात कंगारुंना त्यांनी 13 धावांनी पराभूत केले होते. हा झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा केवळ दुसरा विजय आहे.