आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zimbobwe Made 331 Runs In Test Match Against Bangladesh

बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात झिम्बाब्वेच्या ५ बाद ३३१ धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलना/बांगलादेश - हॅमिल्टन मस्कादजाच्या नाबाद १५४ धावांच्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने बांगलादेशविरुद्ध दुस-या क्रिकेट कसोटीच्या तिस-या दिवशी बुधवारी पहिल्या डावात ५ बाद ३३१ धावा काढल्या. बांगलादेशने पहिल्या डावात ४३३ धावा काढल्या होत्या. झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात अद्याप १०२ धावांनी मागे आहे.

झिम्बाब्वेच्या ५ विकेट शिल्लक आहेत. मस्कादजाने झिम्बाब्वेकडून मागच्या चार वर्षांत दुसरी मोठी खेळी केली. मस्कादजाने ३१६ चेंडूंचा सामना करताना नाबाद १५४ धावा काढल्या. यात त्याने १७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने रोजिस चकाब्वासोबत सहाव्या विकेटसाठी ४७.१ षटकांत १४२ धावांची भागीदारी केली. चकाब्वा नाबाद ७५ धावांवर खेळत आहे. चकाब्वाने १४९ चेंडूंचा सामना करताना आपल्या खेळीत १० चौकार मारले.झिम्बाब्वेने मंगळवारी सकाळी १ बाद ५३ च्या स्कोअरवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी मसकदजा १५ आणि ब्रायन चारी २१ धावांवर खेळत होते. ब्रायन २५ धावा काढून बाद झाला. कर्णधार ब्रेंडन टेलरने ३७ धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने आपल्या ५ विकेट १८९ धावांत गमावल्या होत्या. मात्र, मस्कादजा आणि चकाब्वाच्या शतकी भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. ही जोडी फोडण्यासाठी बांगलादेशने तब्बल ८ गोलंदाजांचा उपयोग केला. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच आली.