आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zurich Challenger Chess Competation: Anand Stopped Carlsen Speed

झुरिच चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धा: आनंदने कार्लसन बरोबरीत रोखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने झुरिच चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी धडक मारली. त्याने मंगळवारी पाचव्या फेरीत वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनला बरोबरीत रोखले. यासह त्याने पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर सारून लढत ड्रॉ केली. दुसरीकडे नार्वेच्या कार्लसनने आठ गुणांसह अव्वल स्थान गाठले. तसेच आर्मेनियाच्या लेवोन एरोनियनला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला इटलीच्या फेबियो कारुआनाने धूळ चारली. या रंगतदार लढतीत लेवोनने विजयासाठी केलेला प्रयत्न अपयशी ठरला. मागील सामन्यात कारुआनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवामुळे एरोनियनची दुस-या स्थानी घसरण झाली. कारुआनाने पाच गुणांसह तिसरे स्थान गाठले.
त्यापाठोपाठ भारताचा विश्वनाथन आनंद, अमेरिकेचा हिकारू नाकामुराने प्रत्येकी चार गुण मिळवून संयुक्तपणे चौथ्या स्थानी धडक मारली. अमेरिकेच्या गेलफांडने बरोबरीत रोखले. त्यामुळे नाकामुराला चौथ्या स्थानी समाधान
मानावे लागले, तर गेलफांडने पराभवाची मालिका खंडित केली. त्याला मागील लढतीत माजी विश्वविजेत्या आनंदने पराभूत केले होते. या लढतीतील विजयाने भारताच्या खेळाडूने स्पर्धेत दमदार सुरूवात केली. यापूर्वी त्याला दोन लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता.