आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zurich Challenger Chess : Vishwanathan Anand Won

झुरिच चॅलेंजर बुद्धिबळ: चौथ्या फेरीत विश्वनाथनचा ‘आनंदी’ आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झुरिच - सलगच्या पराभवांची मालिका खंडित करून माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने झुरिच चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेत विजयाचे खाते उघडले. त्याने चौथ्या फेरीत बोरिस गेलफांडला पराभूत केले. त्याचा हा चार सामन्यांतील पहिला विजय ठरला. यापूर्वी दोन लढतीत त्याला पराभवाला सामोरे जावे लागले, तर तिस-या फेरीत त्याने कार्लसनला बरोबरीत रोखले. या विजयासह तो आता स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतला आहे. आता क्लासिकल राऊंडमध्ये त्याचा सामना कर्लसनशी होईल.
तसेच जगातील नंबर वन आणि वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने गतविजेत्या फेबियो कारुआनाला पराभूत केले. इटलीच्या कारुआनाचा विजय मिळवण्याचा प्रयत्न दुस-यांदा अपयशी ठरला. मागील लढतीत त्याला भारताच्या आनंदने बरोबरीत रोखले. दुसरीकडे आर्मेनियाच्या लेवोन एरोनियनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला धूळ चारली. अमेरिकेच्या खेळाडूवरील विजयाने एरोनियनचे आत्मविश्वास दुणावला आहे.
चौथ्या फेरीअखेर सात गुणांची कमाई करून कार्लसन अव्वलस्थानी विराजमान झाला. एरोनियन पाच गुणांसह दुस-या आणि आनंद, नाकामुरा, कारुआना प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे तिस-या स्थानी आहेत. आनंदविरुद्ध लढतीतील पराभवाचा बोरीस गेलफांडला मोठा फटका बसला. त्याची दोन गुणांसह गुणतालिकेत तळात सहाव्या स्थानी घसरण झाली.