आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना खुश करण्यासाठी माइली पोहोचली रुग्णालयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायिका माइली सायरस आणि तिचा बॉयफ्रेंड लियाम हेम्सवर्थ यांनी सॅन दिएगो येथील बाल रुग्णालयाला नुकतीच भेट दिली.  येथील आजारी मुलांसोबत त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. सुटीच्या दिवशी या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून आनंद मिळवायचा हा या भेटीमागचा उद्देश होता. या दोघांनी रुग्णालयातील गंभीर आजाराने ग्रस्त मुलांसोबत भरपूर मस्ती केली तसेच फोटोही काढले. याच रुग्णालयातील ज्युलिया डेव्हिडसन या आठ वर्षीय मुलीने माइलीला तिचे आवडते गाणे म्हणवून दाखवले.  

या भेटीत माइलीने लाल-पिवळ्या रंगातील फुलांचा हिरव्या रंगाचा शर्ट परिधान केला होता. मुलांनाही अशा रंगाचे ड्रेस आवडत असल्याने मुले खुश होती. अगदी कमी वयाची ही मुले मोठमोठ्या आजारांना किती धिराने तोंड देत आहेत हे पाहून लियामदेखील भावुक झाला. मुलांच्या आई-वडिलांनाही कल्पना न देता माइली आणि लियामनेही ही सरप्राइज व्हिजिट घेतली.