रशियाची राजधानी मॉस्को येथून २००० किलोमीटर अंतरावरील रेजान शहरात राहणारे ३४ वर्षीय सर्गी बियुकिन सांगतात, आमच्या शहरात साम्यवादामुळे अनेक वर्षे धर्मच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या परिसराला ‘गॉडलेस’ म्हटले जायचे. बियुकिन यांनी या शहरातील एका रस्त्याला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्याची याचिका दाखल केली आहे. यावर अनेक नागरिक स्वाक्षऱ्याही करत आहेत. यामुळे दोन्ही देशांतील संबंध सुधारतील तसेच ट्रम्प यांच्याप्रति असलेला आदर दिसून येईल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी कुणी हे गमतीत घेतले तर कुणी यामुळे दोन देशांतील संबंध सुधारतील, असे म्हटले. अनेकांना या रस्त्याचे पूर्वीचे गॉडलेस स्ट्रीट हे नाव आवडत नाही. सर्गी म्हणतात, अमेरिका हा देश रशियासाठी धोकादायक आहे, असा गैरप्रचार केला जात होता. पण हे सत्य नाही. रेजान शहरातील लोक अमेरिकेबाबत सकारात्मक विचार करतात.
-abovetopsecret.com