आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी पुरेसा निधी देणार : ‘ट्रम्प’ ट्विट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन संसदेचे सध्या विशेष सत्र सुरू आहे. यात मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्य योजनेवर चर्चा सुरू आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा सामना केलेले सिनेटर बर्नी सेंडर्स हे संसदेच्या उच्च सदनात नव्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटचे एक मोठे पोस्टर घेऊन पोहोचले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष कोणत्या योजनांसाठी किती निधी खर्च करतील हे ट्विटमध्ये सांगितले आहे.  

बर्नी सेंडर्स हे आजवर नियोजित अध्यक्षांच्या विरोधकांपैकी एक होते. मात्र त्यांनी असे पोस्टर घेऊन येणे हे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. नवे अध्यक्ष देशातील सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर पुरेसा निधी खर्च करतील, असे या पोस्टरद्वारे त्यांनी सांगितले. त्यामुळे ट्रम्प हे आपण दिलेल्या आश्वासनांवर ठाम राहतील असे वाटते. एवढ्यावरही ते कृतीत न उतरल्यास त्यांनी निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने खोटी होती, असे म्हणावे लागेल.