आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांना परराष्ट्र धोरणाचे गांभीर्यच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जगाला काय सांगायचे आहे, हे त्यांनाच माहीत. अध्यक्षपदी विराजमान होऊन महिनाही झाला नाही तर अमेरिका आणि त्याच्या मित्रदेशांच्या संबंधात वितुष्ट आले आहे. हे देश प्रत्येक संकटात अमेरिकेच्या सोबत उभे होते. या देशांतील संबंध मजबूत होण्यासाठी बराक ओबामांनी मोठी भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांच्या विचित्र निर्णयांचे परिणाम विदेशात तैनात असलेल्या अमेरिकन राजदूतांनाही भोगावे लागत आहेत. 
 
द न्यूयॉर्क टाइम्स एडिटोरियल बोर्ड
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथग्रहणापासून आतापर्यंतच्या प्रशासन काळाला ‘हनिमून’ म्हणता येईल. कारण या काळात परराष्ट्र धोरणावरून कोणतेही मोठे संकट उद्भवले नाही; पण व्हाइट हाऊसमध्ये नेमके काय सुरू आहे, याची उत्सुकता जगातील सर्वच नेत्यांना आहे. जागतिक मंचावर अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सर्वांच्या नजरा खिळून आहेत. पण हे फार काळ चालणार नाही. अमेरिका मित्रराष्ट्रांसोबत आहे, हा विश्वास डोनाल्ड ट्रम्प यांना निर्माण करावाच लागेल.  

आजवर नेहमी अमेरिकेसोबत उभे राहिलेले देश सध्या अस्वस्थ आहेत. आंतरराष्ट्रीय आव्हानांना एकजुटीने सामोरे जाण्यासाठीच्या प्रयत्नांत ट्रम्प यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.  
व्हाइट हाऊसमधील सुंदर अोव्हल ऑफिसमध्ये बसून डोनाल्ड ट्रम्प जागतिक नेत्यांशी फोनवर चर्चा करण्यात व्यग्र आहेत. काही आठवड्यांपासूनच हे ‘चर्चासत्र’ सुरू झाले असले तरी यामुळे जगातील नेते हैराण आहेत. ट्रम्प मित्रराष्ट्रांच्या नेत्यांशी उद्धटपणे बोलतात. फोनवरच त्यांचा अपमान करतात आणि माध्यमांना याची माहिती पुरवतात. त्यांच्या अशा बेताल वक्तव्यांमुळे मित्रराष्ट्रांच्या भावना निश्चित दुखावत आहेत.  

अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने मित्रराष्ट्रांची साथ अत्यंत महत्त्वाची आहे, हे ट्रम्प यांना कळायला हवे. ते मित्रराष्ट्रांचा असा सतत अपमान करू शकत नाहीत. ओबामा प्रशासनाने ज्या उंचीवर, महत्त्वाच्या स्थानांवर अमेरिकेला पोहोचवले आहे, तेथून अशी एकाएकी माघार घेता येणार नाही, हेदेखील ट्रम्प यांना समजले पाहिजे. उदाहरणार्थ, मागील आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने रशियाला पूर्व युक्रेनमध्ये कठोर भूमिका घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच गाझा आणि पॅलेस्टिनी परिसरातही विशेषत: वसाहतींच्या बाबतीत फार लक्ष न घालण्याचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या आजवरच्या कृतीकडे पाहता, परराष्ट्र संबंधांबाबत त्यांची भांडखोर वृत्ती दिसून येते. त्यांनी आपल्या ‘एक्झक्युटिव्ह ऑर्डर’मध्येही हेच केले आहे. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमध्ये सर्वाधित दिशाभूल करणारा निर्णय म्हणजे सात मुस्लिम देशांच्या नागरिकांवर घातलेली प्रवेशबंदी. यातून अमेरिकाच कमकुवत असल्याचा संदेश जातो. ट्रम्प प्रशासनाचा अमेरिकन प्रतिमेवर काय परिणाम होत आहे, हे युरोपातील आंदोलनांवरून दिसतेच आहे. केवळ आंदोलनेच नाहीत, तर बातम्यांमधूनही ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे.  

द स्पीगल या जर्मनीच्या प्रसिद्ध मासिकाने डिजिटल अंकाच्या मुखपृष्ठावर डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यंगचित्र लावले आहे. त्यांच्या एका हातात रक्तबंबाळ अवस्थेतील स्वातंत्र्यदेवता असून दुसऱ्या हाती चाकू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या अशा वर्तणुकीची शिक्षा विदेशातील अमेरिकन राजदूतांना भोगावी लागत आहे. त्यांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांसाठी उत्तरेच देता येत नाहीत.  
ट्रम्प यांच्या वर्तणुकीचे मित्रराष्ट्रांवर काय परिणाम होत आहेत, हे जाणण्यासाठी दोन फोन कॉलचे उदाहरण घेऊया-  
पहिला : ट्रम्प यांनी पहिला निशाणा मेक्सिकोवर साधला. हा अमेरिकेचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यावसायिक मित्रदेश आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष हेनरिक निएतो यांनी ट्रम्प प्रशासनाशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा आधी मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी कसा उभारणार, याची योजना घेऊन या, असे व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेक्सिकोतून आयात होणाऱ्या वस्तूंवर ज्यादा कर लावण्याचा मुद्दाही बहुधा यात समाविष्ट होता. ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर निएतो यांच्याकडे वॉशिंग्टन दौरा रद्द करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मेक्सिकोतून येणाऱ्या ‘वाईट’ माणसांपासून रक्षण करण्यासाठी अमेरिका व मेक्सिको सीमेवर लष्कर तैनात करू, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली. मात्र, ती केवळ गंमत होती, असे ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.  
दुसरा : ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यावर निशाणा साधला. टर्नबुल आणि बराक ओबामा यांच्यादरम्यान चांगले संबंध होते. ऑस्ट्रेलियादेखील अमेरिकेचा घनिष्ठ मित्रदेश आहे. २० जानेवारीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ताब्यात असलेल्या एका बेटावर निर्वासितांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन ओबामा यांनी टर्नबुल प्रशासनाला दिले होते.  ट्रम्प टर्नबुल यांच्यावरच तुटून पडले. त्यानंतर त्यांना पश्चात्तापही झाला नाही. इराक, अफगाणिस्तान युद्धासह अन्य गुप्त प्रकरणांमध्ये डोळे झाकून अमेरिकेचे म्हणणे मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा ट्रम्प यांनी अपमान केला. विशेष म्हणजे त्यांना याचा जराही पश्चात्ताप नाही. 
 
ट्रम्प एकाकी पडू शकतात
-राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने अशीच भांडखोर वृत्ती कायम राखली तर लवकरच देशाचे सर्व मित्रदेशांसोबतच्या संबंधांत कटुता येईल. अमेरिकेत विरोधी नेत्यांचे प्रमाण वाढत आहे. वेळ आली तर याच पारंपरिक मित्रदेशांकडे मदतीसाठी अमेरिकेला क्षमायाचना करावी लागेल. पण त्या वेळी सर्वांनीच ट्रम्प यांना एकटे पाडल्यास त्यात फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.  
© The New York Times
बातम्या आणखी आहेत...