आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhakti Sharma Practicing Hard For The Dream Of Mother

WOMEN'S DAY SPECIAL: आईच्‍या स्‍वप्‍नांसाठी झटणारी जलपरी- भक्ती शर्मा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- वयाच्‍या केवळ तिस-या वर्षी स्विमिंग शिकून सोळाव्‍या वर्षी इंग्लिश खाडी पार करुन उदयपूरची जलपरी भक्ती शर्मा आणखी एक विक्रम मोडण्‍याची तयारी करीत आहे. इंग्लिश खाडी पूर्ण करुन तिने आईचे स्‍वप्न पूर्ण केले. आणखी एक रेकॉर्ड मोडून तो भक्तीला तिच्‍या आईला अर्पण करायचा आहे.

भक्तीची आई लीना शर्मा हिने लग्‍नापूर्वी मुंबईत राष्‍ट्रीय जलतरण स्‍पर्धेत प्रथम स्‍थान प्राप्‍त केले होते. परंतु, लवकरच तिचे लग्‍न झाले आणि जलतरण एक स्‍वप्‍न बनून गेले. तेव्‍हा तिने अपत्‍याला जलतरणपटूच बनविण्‍याचा निश्‍चत केला होता.

जलपरीचे आगमन

भक्तीचा जन्‍म झाला तेव्‍हा आपल्‍या घरी जलपरी आली आहे, असे लीनाला वाटले होते. केवळ अडीच वर्षांची असताना भक्ती आईचे बोट धरून स्विमिंग शिकली. त्‍यानंतर ऊन, पाऊस, थंडी, वारा कशाचीही तमा न बाळतगता तिने स्विमिंगचा सराव केला. ती रोज कमीतकमी 1 तास सराव करायची. ती 14 वर्षांची होती तेव्‍ही तिने मुंबईत 36 किलोमीटर अंतर पार करण्‍याचे प्रशिक्षण घेतले. त्‍यानंतर वयाच्‍या सोळाव्‍या वर्षी तिने इ‍ंग्लिश खाडी पार केली. या व्‍यतिरिक्त तिने 3 राष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये विजेतेपद पटकाविले. यावर्षी डिसेंबरमध्‍ये अंटार्क्टीक समुद्र पार करण्‍याचे भक्तीचे लक्ष्‍य आहे. त्‍यासाठी ती दररोज स्विमिंग पूलमध्‍ये बर्फ टाकून सराव करते. हा विश्‍वविक्रम पूर्ण केल्‍यास तो आईला अर्पण करीन. हे आईचेच स्‍वप्‍न होते जे ती पूर्ण करीत आहे, असे भक्ती सांगते.