आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Woman Pride Award: समस्यांवर मात करून घडवला आदर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योती परिहार यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1968 ला झारखंडच्या सिंदरी शहरातील एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील बोकारो स्टिल प्लॉंटमध्ये इंजिनिअर होते. जेव्हा त्या दुसरीत होत्या तेव्हा त्यांच्या वडीलांचा कंपनीत झालेल्या एका दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या वडीलांना सात भाऊ होते. प्रत्येकाने एका-एका मुलाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली. ज्योती यांचे पालन-पोषण आजोबांनी बिहारमधील दरभंगा शहरात केले.
दरभंगामध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाले. मनोविकार शिक्षणात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी इग्नू येथून सृजानात्मक लेखनामध्ये डिप्लोमा करून स्वतंत्र स्परुपात वर्तमानपत्र, मासिक, दुरदर्शनसाठी लिहायला लागल्या. लेखिकेच्या रुपात त्यांनी बाल मानसशास्त्रावर आधारित 10 पुस्तकांचे लिखाण केले. त्यांनी पटनामध्ये 'निदान' नावाच्या एक स्वयंसेवी संस्थाशी जोडून महिलांना संघटीत करण्याचे काम केले आहे. निदान संस्थेशी जोडून त्यांनी गरीब कामगार महिलांसाठी को-ऑपरेटिव्ह संस्थेची स्थापना केली.
1. यूटेन्सिल व्हेंडर महिलांसाठी को-ऑपरेटिव्ह
2. कचरा वेचणा-या महिलांसाठी 'स्वच्छ धरा' को-ऑपरेटिव्ह.
3. किराणामाल विकणा-या महिलांसाठी दानपूर येथे को-ऑपरेटिव्ह.
4. गरीब महिलांसाठी गृह-निर्माण 'घरौंदा' को-ऑपरेटिव्ह.
5. 'संचय' महिला बँक.
2003 मध्ये सर्व शिक्षा अभियानाशी जोडून त्यांनी बिहारच्या सीमेलगतच्या जिल्ह्यांमधील मुलींना ट्रॅफिकिंगच्या समस्येपासून कसे वाचायचे यासाठी 'ज्ञानज्योति योजना'ची सुरूवात केली. वर्ष 2008, जानेवारीमध्ये बिहारच्या सात सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या माध्यमातून इयत्ता 6, 7 आणि 8 मध्ये 40,000 मुलींना स्थानिक उत्पादन संबंधीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्याव्दारे निर्मित सामग्रीच्या मार्केटिंगची व्यवस्था केली.
त्यांनी बिहारच्या सर्व जिल्ह्यांमध्ये 10 वर्षांच्या पुढील 13,000 मुस्लिम मुलींना NIOS व्दारा पटनामधून शिक्षण देण्याची योजना तयार केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या संस्थेचे उद्घाटन केले. आज या कार्यक्रमाशी जोडून संपूर्ण बिहारमधील 86,518 मुली विविध विषयांवर प्रशिक्षण घेत आहेत.
सध्याच्या स्थितीत ज्योती परिहार 'किलकारी', बिहारच्या बाल भवन संस्थापक प्रमुखाच्या रुपात कार्य करत आहेत. शिक्षण विभाग, बिहार सरकारव्दारे तयार केले गेलेल्या गरीब मुलांच्या या संस्थेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. फक्त पाच वर्ष जूनी ही संस्था आज 5280 मुलांना विविध 20 विषयांवर प्रशिक्षण देत आहे. बिहारच्या पाच जिल्ह्यांमध्ये या संस्थेच्या 20 शाखा आहेत.
संस्थेच्या सुविधा
- किलकारीची मुले गेल्या पाच वर्षांपासून प्रत्येक महिन्याला एक मासिक वर्तमानपत्र काढतात. काही पुस्तकेदेखील त्यांनी लिहिलेली आहेत.
- किलकारीमधील मुलांसाठीही एक खास बँक आहे. पूर्णत: मुलांव्दारे संचलित या बँकेत 1712 बाल सदस्य आहे. या बँकेत गरीब मुलांनी आतापर्यंत 14 लाख 58 हजार रुपयांची बचत केली आहे. बँकची एकूण उलाढाल 24 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- डिसेंबर 2012 मध्ये किलकारी संस्थेने चार दिवस मुलांसाठी बाल ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. यामध्ये जवळपास 7500 मुलांनी दहा प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग नोंदवला होता. वर्ष 2014च्या लिमका बुकमध्ये हा विक्रम नोंदवला जाणार आहे.
- विद्यार्थी अभिषेक राजने टीव्हीच्या रिअ‍ॅलिटी शो इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमधील शेवटच्या एपिसोडपर्यंत आपले स्थान टिकवून ठेवले होते.
- केतन मेहता यांचा 'झांकी द माउंटेन मॅन' सिनेमात संस्थेचे आठ मुलांनी अभिनय केला.
- वर्ष 2012मध्ये किलकारीच्या मुकेशला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाला आहे.
ही स्टोरी सुमन कुमार (पटना) यांनी शेअर केली आहे. जर तुमच्या जवळ अशा काही सत्य घटनेवर आधारित यशस्वी कथा असतील शेअर करा...