आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kriti Bharati Who Is Fighting Against Child Marriage

बालविवाह संपविण्‍याचा विडा उचलणारी कृति भारती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- बालविवाह ही भारतीय समाजाला लागलेली किड आहे. ही प्रथा संपविण्‍याचा विडा उचलणारी 24 वर्षीय कृति भारती आज याच कारणामुळे ओळखली जाते. कोणत्‍याही मुलाचे शोषण होऊ नये तसेच कोणताही मुलाचे आयुष्‍य बालविवाहामुळे उद्ध्‍वस्‍त होऊ नये, यासाठी ती झटत असते. 'सारथी' नावाच्‍या सामाजिक संस्‍थेच्‍या माध्‍यमातून तिने अनेक बालविवाह रोखले आहेत. जोधपूर आणि जवळपासच्‍या परिसरात तिचे काही हेर आहेत. जे तिला बालविवाहाची माहिती पुरवितात. अनेक युवकही स्‍वतःचा बालविवाह रोखण्‍यासाठी तिला संपर्क साधतात. पोलिसांच्‍या मदतीने ती बालविवाह रोखते. अर्थात तिला यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा तिला धमक्‍याही मिळाल्‍या आहेत. परंतु, तिने बालविवाह समूळ नष्‍ट करण्‍याची शपथच घेतली आहे. त्‍यामुळे तिला कोणीही रोखू शकले नाही.
कृति गेल्‍या 5 वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहे. ती बाल शोषण, बाल कामगार आणि बालविवाहाच्‍या विरोधात लढा देत आहे. पदवी अभ्‍यासक्रमात तिने मानसशास्‍त्र अधिक चांगल्‍या पद्धतीने समजण्‍यासाठी गतिमंद मुलांसोबत काम केले. त्‍यानंतर तिने मुलांना समुपदेशनाचे काम सुरु केले. हे काम करताना तिला बालविवाहासारख समस्‍येचे गांर्भीय लक्षात आले. बालविवाहामुळे त्रस्‍त झालेली अनेक मुले तिच्‍या संपर्कात आली. त्‍यापासून प्रेरणा घेत 2012 मध्‍ये तिने 'सारथी' संस्‍थेची स्‍थापना केली. या संस्‍थेमार्फत अनेक लहान मुलामुलींची बालविवाहपासून सुटका करण्‍यात आली आहे. 2012 मध्‍ये लक्ष्‍मी नावाच्‍या मुलीचा बालविवाह रोखल्‍यानंतर कलर्स वाहिनीवरील 'बालिका वधू' मालिकेच्‍या टीमने कृति आणि लक्ष्‍मीचा मुंबईत गौरव केला होता. याशिवाय वीर दुर्गादास राठोड युवा सन्‍मानानेही तिला गौरविण्‍यात आले आहे.