आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Bhanwari Devi An Inspirationa To All Women

WOMEN'S DAY SPECIAL: भंवरी देवी- महिलांच्‍या संघर्षाचे प्रतिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- महिलांचा सन्‍मात, महिलांचे संरक्षण यावर प्रचंड गदरोळ होत आहे. सरकार महिलांच्‍या सुरक्षेबाबत सतत आश्‍वासने देत आहे. परंतु, प्रत्‍यक्षात महिलांना न्‍यायासाठी कडवी लढाई लढावी लागत आहे. न्‍यायासाठी लढणारी अशीच एक महिला भंवरी देवी. दिल्‍लीमध्‍ये 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्‍या सामुहिक बलात्‍कारानंतर देशभरात खळबळ उडाली होती. अगदी राष्‍ट्रपती भवनापर्यंत या प्रकरणातील पीडितेला न्‍यायाच्‍या मागणीसाठी तरुणाई धडकली होती. तिला मृत्‍यूवर मात करता आली नाही. परंतु, तिने एका ज्‍वलंत विषयाला वाचा फोडली. याच ओघात आणखी एक ज्‍वलंत मुद्दा पुढे आला तो म्हणजे बलात्‍कार पीडित महिलांना न्‍यायासाठी द्यावा लागणारा संघर्ष.

बलात्‍कारचे खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. आरोपी निर्दोष सुटतात. तसेच या प्रकरणांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त 7 वर्षे शिक्षेची तरतूद आहे. शिक्षा भोगून आरोपी नंतर मोकाट फिरतो. परंतु, पीडित महिलेचे आयुष्‍य त्‍याने उद्ध्‍वस्‍त केलेले असते. तिच्‍या मनावर खोलवर जखमा झालेल्‍या असतात. भंवरी देवी याचेच एक ज्‍वलंत उदाहरण आहे. ती तब्‍बल 27 वर्षांपासून बलात्‍काराच्‍या वेदना भोगत आहे. भंवरी देवी राजस्‍थानची. तिने सर्वप्रथम बाल विवाहाविरोधात आवाज उठविला. त्‍याचे मोल तिला द्यावे लागले. समाजातील तथाकथित उच्‍चभ्रू आणि रुढीवादी लोकांनी तिच्‍यावर सामुहिक बलात्‍कार केला. या घटनेवर 'बवंडर' नावाचा चित्रपट निघाला. त्‍यानंतर तिच्‍या बाजुने अनेकांनी आवाज उठविला.

भंवरीला लंडनच्‍या महिलांनी 2 लाख रुपये पाठविले. चीनमध्‍ये एका परिषदेत तिला आमंत्रित करण्‍यात आले. तिला 1994 मध्‍ये नीरजा भनोत स्‍मृति पुरस्‍कारानेही सन्‍मानित करण्‍यात आले. 2011 मध्‍ये भंवरीला गॉडफ्रे फिलिप्‍स वीरता पुरस्‍कारही देण्‍यात आला. आजही ती बलात्‍कारासारख्‍या गुन्‍ह्यांविरुद्ध लढा देत आहे. दिल्‍ली सामुहिक बलात्‍कार प्रकरणानंतर तिनेही निदर्शने केली.