छायाचित्रात दिसणा-या या महिलेचे नाव कपिलाबेन चौधरी आहे. त्या सूरत जिल्ह्यातील आदिवासी गांगपूर हर्षदमध्ये राहतात. कपिलाबेन 'जय अंबे महिला विकास मंडल'च्या वतीने चालणा-या राइस मिलच्या प्रमुख असून गावातील अनेकांना त्यांनी मजूरी मिळवून दिली आहे. कपिलाबेन आदिवासी जरी असल्या तरी त्या एखाद्या सुशिक्षित व्यक्तीसारख्या इतरांशी संवाद साधतात. त्यांच्या गावाचे नशीब बदलणा-या कपिलाबेन यांचे आयुष्य आजही साधेच आहे. त्या आज गावातील लोकांना जाऊन सांगतात, की त्यांच्या मिलमध्ये येऊन लोकांनी आपले धान्य स्वच्छ करावे. त्यांना इथे कोणताही त्रास होणार नाही. कपिलाबेन यांनी फक्त आपल्याच गावाची नाही तर आजूबाजूंच्या गावांचीही मदत केली आहे.
आमच्या प्रतिनिधीला कपिलाबेन यांनी सांगितले, 'जवळपास 700-800 रहिवाशांचे आमचे गाव खूप छोटे आहे. येथील लोकांचे आयुष्य शेतीसारख्या व्यवसायांवर आधारित आहे. एकेकाळी आमच्या गावातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणेही कठिण होते. इथे राहणा-या प्रत्येकाची अशीच व्यथा होती. प्रशासकीय लोक इथे नेहमीच येत होते. परंतु प्रत्येकवेळी मोठ-मोठी आश्वासने देऊन निघून जात होते. कुणी शेती व्यवसायाविषयी बोलत तर कुणी शिक्षणाविषयी, परंतु कुणीच हे नाही सांगितले, की आम्ही दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी काय करावे.'
कपिलाबेन सांगतात, 'आम्ही विचार केला, की जर महिला मंडळाने एक व्यवसाय सुरू केला तर सरकार त्याला नक्कीच मदत करते. आम्ही हा निर्णय घेऊन एक छोटे मंडळ तयार केले. त्यानंतर आम्ही निश्चय केला, की गावाच्या बाहेर जाऊन कोणताच व्यवसाय करायचा नाही. कारण बचत केलेले पैसे आपल्या येण्या-जाण्यातच खर्च होऊन जातील. म्हणून आम्ही निश्चय केला, की आपल्याच गावात एक राइस मिल चालू करायची.'
आता मोठी समस्या ही होती, की जर आम्ही ही राइस मिल चालू केली तर मिलमध्ये कोण येईल? म्हणून आम्ही राइस मिल चालू करण्यापूर्वी आसपासच्या जवळपास 21 गावांत मिलचा प्रचार केला. आमच्या कष्टाने आणि प्रयत्नाने इतर गावातील लोकांना प्रभावित केले आणि त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर राइस मिलसाठी आम्ही सरकारकडून 2 लाख 25 हजारांची मदत मागितली. अधिका-यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला ही मदत दिली. आम्ही रात्रं-दिवस कष्ट केले आणि काही पैसे जमवून गावातील लोकांची मदत घेऊन एका नापिका जमिनीवर घर बांधले. आम्ही त्या घरात ते मशीन आणून ठेवले.
सुरवातीला आमच्याकडे लोक येत नसल्याने आम्ही निराश झालो. परंतु आम्ही खचून गेलो नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा गावां-गावांत प्रचार सुरू करून याविषयी लोकांना माहिती दिली. आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळाले, की लोक धान्य स्वच्छ करण्यासाठी आमच्या मिलमध्ये यायला लागलेत. लोकांना आमचे काम आवडले आणि मिलमध्ये येणा-या लोकांची संख्याही वाढत गेली.
आज आमच्या मिलमध्ये जवळपास 50 गावांतील लोक तांदूळ स्वच्छ करण्यासाठी येतात. आमची प्रति वर्षाची कमाई तीन लाखांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त आम्ही 50 हजार रुपये बँकेत बचत म्हणून ठेवले आहेत. आता आम्ही प्रत्येक महिन्याला एक मिटींग घेतो, त्यामध्ये पुढे काय-काय करता येईल यावर चर्चा करतो.
कपिलाबेन आजही तसेच काम करत आहेत. आज त्या एका गावासाठीच नव्हे तर पूर्ण देशासाठी एक प्रेरणा बनल्या आहेत. गावातील कोणत्याही कुटुंबात काही अडचण आल्यास त्या त्यांना कधीही मदत करण्यास तयार असतात. कपिलाबेन आजही गावागावांत जाऊन प्रचार करतात, की लोकांनी त्यांच्या मिलमध्ये येऊल धान्य स्वच्छ करावे.