आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ले डेव्हिडसनवर महिला स्वार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्ले डेव्हिडसन, हे नाव ऐकताच एक अगडबंब बाइक आणि ती चालवणार्‍या मॅचोमॅनची प्रतिमा दिसू लागते. मात्र, काळाबरोबर हा ट्रेंडही बदलत आहे. एकेकाळी फक्त पुरुषांची पसंती असलेली ही हेवी बाइक आता अनेक महिलाही खरेदी करत आहेत. गेल्या महिन्यात गोव्यात या अमेरिकन बाइकच्या 110 व्या वाढदिवशी 500 पेक्षा जास्त हार्ले चालक सहभागी झाले होते. त्यात अनेक महिलाही होत्या. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी हार्ले डेव्हिडसनची ग्रेट ग्रँडडॉटर कारेन डेव्हिडसन पहिल्यांदा भारतात आली. येथे महिला चालकांचा जोश पाहून कारेनला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली की, मला लहानपणापासूनच बाइक चालवण्याचे वेड आहे. त्यासाठी माझ्या दोन भावांशी माझे नेहमी भांडण होत असे. तरीही मी बाइक शिकलेच. माझ्यासाठी हार्ले म्हणजे स्वातंत्र्य आहे.

आज हार्ले चालवणे हे स्वातंत्र्य आणि सबलीकरणाचे प्रतीक बनल्याचे कारेन मानते. तिच्या या मतास पाठिंबा देत हार्ले डेव्हिडसनच्या देशातील पहिल्या महिला ग्राहक शीजा मॅथ्यू म्हणतात की, ही त्यांची ड्रीम बाइक आहे आणि ती मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रतीक्षा केली. शीजा यांच्या आठ वर्षांच्या मुलालाही आपल्या स्ट्राँगेस्ट मॉमसह हार्ले राइड आवडते. पुण्याच्या मारल याजरलू सांगतात की, हार्ले चालवण्याचा अनुभव अद्भुत आहे. इतर कुठलीही बाइक चालवून तो मिळत नाही. तसेच हार्लेची सर्वात महाग बाइक हार्ले डेव्हिडसन रोडकिंग चालवणार्‍या पल्प स्ट्रॅटेजी कम्युनिकेशनच्या एमडी व सीईओ अंबिका शर्मा यांनाही सुपरबाइक चालवण्याचे वेड आहे.