आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMEN\'S DAY SPECIAL: विधवांच्‍या हक्‍कांसाठी झटणा-या जिनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- कॅनडात 1942 मध्‍ये जन्‍मलेल्‍या जिनी यांनी भारताला कर्मभूमि बनविले. त्‍या 1970 मध्‍ये भारतात आल्‍या. त्‍यांनी एकट्या महिलांसाठी काम सुरु केले. जिनी यांचे पूर्ण नाव व्‍हर्जिनिया. वयाच्‍या विसाव्‍या वर्षापासूनच त्‍यांनी समाजसेवा सुरु केली. त्‍यांनी किंग्‍स्‍टन येथील क्‍वीन्‍स विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. कॅनडामध्‍येच त्‍या महिलांचे गट स्‍थापन करुन त्‍यांना स्‍वावलंबी बनण्‍यासाठी प्रेरित करत. ओम श्रीवास्‍तव यांच्‍याशी 1970 मध्‍ये लग्‍न केल्‍यानंतर त्‍या भारतात उदयपूर येथे आल्‍या. या दांपतयाने सामाजिक संघटनांसोबत ग्रामविकास आणि प्रौढ शिक्षणावर काम करणे सुरु केले. त्‍यांनी 1986 मध्‍ये 'आस्‍था' संस्‍थेची स्‍थापना करुन विधवांसाठी काम सुरु केले.

भारतात विधवांची परिस्थिती अतिशय दयनिय असल्‍याचे जिनी यांना जाणवले. नव-याच्‍या मृत्‍यूनंतर सासरची मंडळी महिलांना घरातून काढून टाकतात. यामागील प्रमुख कारण म्‍हणजे विधवेला मालमत्तेतील वाटा मिळू नये, हे आहे. अशाच काही पीडित महिलांना एकत्रित करुन त्‍यांनी एकल नारी शक्ती संस्‍था सुरु केली. ही संघटना अशा महिलांना त्‍यांचा हक्‍क प्राप्‍त करु देण्‍यात मदत करते. याशिवाय त्‍यांना स्‍वावलंबी बनण्‍यासाठी प्रशिक्षणही संस्‍थेमार्फत देण्‍यात येते. ही संघटना राजस्‍थानच्‍या 25 जिल्‍ह्यांमध्‍ये कार्यरत आहे. संस्‍थेचे 17 हजारपेक्षा जास्‍त सदस्‍य आहेत. जिनी यांना 2005 मध्‍ये नोबल शांतता पुरस्‍कारासाठी नामांकनही मिळाले होते.