आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 4 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- यांच्यावर युरेनसचा प्रभाव असतो. ज्यांच्या जन्म ४,१३,२२ आणि‍ ३१ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ४ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- येणारे वर्ष इव्हेंटफूल आणि‍ अनेक बदलांचे असेल. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकावे. विशेषत: विवाह करावयाचा असेल किंवा नवीन कामास सुरुवात करायची असेल तर अधिक काळजीपूर्वक वागावे.

- आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. पूर्ण वर्षभर अर्थविषयक बाबींकडे दुर्लक्ष करणे किंवा उशीर करणे टाळावे.

- काहीही बोलण्यापूर्वी क्षणभर विचार करावा अन्यथा कौटुंबि‍क संबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. लक्षात ठेवा, शब्द बाणांप्रमाणे असतात, एकदा उच्चारले की परत घेता येत नाहीत. उच्च विचार आत्मसात कराल, चांगला दृष्टिकोन ठेवाल तर निश्चितच वाहवाही मिळवू शकाल.

- ज्याप्रमाणे सजावटीविना सलार्ड अपूर्ण ठरते तसेच तुम्ही प्रेझेंटेशनकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. नव्या कल्पना आणि‍ नवनवीन बाबींपेक्षा त्यांच्या मांडणीकडे म्हणजेच प्रेझेंटेशनकडे खास लक्ष द्यावे.

- आरोग्याच्या बाबतीतही या वर्षात आपल्याला काळजी घ्यावी लागेल. विशेषत: शरीराच्या खालील भागाकडे लक्ष द्यावे लागेल.

- युरिनरी ट्रेक्ट किंवा पायांचे दुखणे सतावेल.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.