आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 1 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- यांचा स्वामी सूर्य आहे. महिन्याच्या १,१०, १९ व २८ तारखेला जन्मलेल्यांचा भाग्यांक १ ग्राह्य धरण्यात आला आहे.

- अंकशास्त्रात १ हा अंक सूर्याचे प्रतिनिधित्व करतो. यासाठी हा भाग्यशाली अंक आहे. यामागची मीमांसा अशी : या राशीची व्यक्ती प्रदर्शित करते की ती कोणत्या प्राधिकाराच्या स्थितीत आहे.

- हा भाग्यांक असलेल्यांना कोणत्याही प्रकारची निष्क्रियता धोकादायक आहे.

- सन २०१५ मध्ये अंक १ व ८ यांच्यातील संबंध सामंजस्यपूर्ण आणि तणावपूर्ण अशा दोन्ही प्रकारचे असतील. यामुळे वर्षाच्या पूर्वार्धात काही प्रमाणात तणाव अधिक असेल. मात्र, उत्तरार्धात ही स्थिती बर्‍यापैकी सावरेल. एकूण हे सर्व
बर्‍यापैकी असेल.

- ज्युनियर्सना तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असेल. बुजुर्गांसोबत वाद करणे टाळा. निंदक नेहमीच वाईट नसतात. सेकंड ओपिनियन खास करून वडीलधार्‍यांकडून घेण्यास संकोच करू नका.

- उद्दिष्टांवर काटेकोरपणे नजर ठेवा. प्रारंभी उशीरही होऊ शकतो. तथापि, कठोर परिश्रमांच्या जोरावर हे आव्हान यशस्वीपणे पेलता येऊ शकते.

- आरोग्य जपण्यावर भर द्या. नकारात्मक विचारांना मनात येऊ देऊ नका. कारण, यामुळे मानसिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल.

- वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसेल.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.