आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 6 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- अशा व्यक्तींवर शुक्राचा प्रभाव असतो. ज्यांच्या जन्म ६, १५ आणि‍ २४ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ६ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- अंक ६ आणि ८ एकमेकांसाठी मित्रवत आहेत. जो अंक त्यांच्या प्रभावात असेल त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले फळ देणार असेल.

- वर्षभर आपले पूर्ण लक्ष संबंध, भौतिक फायदे आिण सामाजिक समारंभांवर असेल.

- भावनिक दृष्टिकोनातून पाहिले तर वर्षभर आपणास काही चढ-उतारांचा सामना करावा लागेल. त्यामुळे फक्त आपले मन काय सांगते तेच पाहू नका, इतरांचा सल्ला घेणेही आवश्यक ठरेल. अन्यथा भावनात्मक आिण आर्थिक बाबतीतही आपल्याबरोबर धोका होण्याची शक्यता आहे.

- आपल्यावर अवलंबून असणार्‍या आणि‍ नेहमी मदत करणार्‍यांची विशेष काळजी घ्या. पुढे याच व्यक्ती आपणास साहाय्यभूत होतील.

- नवीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर फायदा मिळू शकतो. मात्र पैशाची बाजू मजबूत असायला हवी.

- आगामी वर्षात एकाच वेळी जास्त जोखीम असणार्‍या कर्जांपासून दूर राहा.

- विवाह ठरवण्याच्या बेतात असाल तर या वर्षी थोडेसे थांबावे लागेल.

- आपली योग्यता वाढवणे आणि‍ पुढे जात राहण्यासाठी हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगले ठरणार आहे.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.