आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 2 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- २ हा अंक चंद्राचे प्रतिनिधित्व करतो. ज्या व्यक्ती महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मतात त्यांचा भाग्यांक २ हा मानण्यात आला आहे.

- या वर्षी उद्दिष्टे पूर्ण करण्यात तुम्हाला अडचणी भेडसावतील. यामुळे तुम्ही तणावाखाली असाल. आरोग्यावरही परिणाम होईल. यामुळे तणावाला तुमच्यावर वरचढ होऊ देऊ नका.

- स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करा. नियमित योगासने, प्राणायाम, ध्यानधारणेसह व्यायाम करणे हितकारक ठरेल. बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी याचा मोठा फायदा होईल.

- लक्षात असू द्या, हवामान वाईट असेल तर चुकूनही ड्रायव्हिंग करू नका.

- मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. मग ती आर्थिक असो वा भावनिक. पुस्तकाच्या केवळ मुखपृष्ठाकडे पाहून पुस्तकावर विश्वास करू नका. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत राहा.

- इतरांकडून प्रेरणा घेण्याच्या अपेक्षेऐवजी स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा.

- असे म्हटले जाते की, ८ हा अंक (शनीचे प्रतिनिधित्व करतो) तुमच्यासाठी खलनायक आहे. मात्र, मेहनत व एकनिष्ठेत कुचराई केली नाही तर हाच अंक तुम्हाला वेळ आल्यानंतर चांगले फलही देतो.

- ज्या व्यक्ती क्रिएटिव्ह क्षेत्रांत आहेत त्यांची कामगिरी चांगली राहू शकते.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.