आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarot Cards Kumbh New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

कुंभ - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभ
नव्या वर्षाचा प्रारंभ सकारात्मक विचार व दृष्टिकोनातून करा. तुमची मेहनत लवकरच फळाला येईल. तुम्हाला एखाद्या वार्तेची प्रतीक्षा असेल तर ती सुखद वार्ता लवकरच मिळेल. या वर्षी कोणताही निर्णय घेण्याआधी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या. विशेषत: व्यक्तिगत प्रकरणांत विवाह अथवा नाते जपताना ही काळजी घ्या. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही तणावात असाल तर ती बाब थोडीशी बाजूला ठेवून वर्तमानाचा विचार करा. जुन्या गोष्टी आठवून काहीच फायदा होणार नाही. त्यापासून योग्य बोध घेऊन भविष्य चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही कामात घाईगडबड करू नका. जे काम जेव्हा पूर्ण व्हायचे असेल तेव्हाच ते होईल. तुम्ही फक्त प्रयत्न करत राहा. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दु:खी असाल किंवा मनावर ताण असेल तर आपल्या भावना मनमोकळेपणे मांडा. त्यामुळे मन:शांती मिळेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...