आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Virgo Tarot Cards New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

कन्या - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या
या वर्षात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात संयम, आत्मसमर्पण आणि सातत्य कायम ठेवणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला जीवनशैली आणि खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे बदल करावे लागू शकतात. ही परिस्थिती कठीण असू शकते; परंतु काळ जाईल, तशी परिस्थिती अनुकूल होईल. आध्यात्मिक दृष्टीने हे वर्ष अत्यंत फलदायी ठरेल. आध्यात्मिक विकासाकडे मन आकर्षित होईल. अध्यात्म हा केवळ आयुष्यातील एक भाग नसून ती जीवन जगण्याची कला आहे, ही बाब तुमच्या आयुष्यात या वर्षी तंतोतंत उतरेल. कामाच्या ठिकाणी यावर्षी प्रगतीचे योग आहेत. नात्यात स्पष्टपण आणि सखोलता आवश्यक आहे. अनासक्तीचा भाव तुमच्यासाठी वरदान ठरेल. कारण अशी भावना असल्यासच तुम्ही परिस्थिती आणि नातेसंबंधांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकाल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...