अॅजबेस्टनच्या मैदानावर झालेल्या वन डे मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडला 9 विकेटने पराभूत करत भारताने गोर्या साहेबांच्या भूमीवर 24 वर्षांनंतर मालिका विजय मिळवला.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (73 वर यासाठी)
इंग्लंड दौर्यावर
टीम इंडिया आधी कसोटी मालिकेत अत्यंत मोठ्या फरकाने पराभूत झाली होती. पण वन डे मालिकेत पुनरागमन करत 24 वर्षांनंतर मालिका जिंकून चाहत्यांना संघाने आनंदाचे क्षण बहाल केले.
फॅक्ट फाइल
- अॅजबेस्टनच्या मैदानावर तिसर्या वन डे मध्ये भारताने नाणेफेक जिंकत इंग्लंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते.
- भारतीय गोलंदाजांनी धारदार कामगिरी करत इंग्लंडचा डाव 206 धावांवर गुंडाळला. मोहम्मद शमीने केवळ 28 धावांच्या मोबदल्यात 3 वीकेट घेतल्या होत्या.
- इंग्लंडकडून मोईन अलीने धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. अलीने 50 चेंडूंमध्ये 67 धावा ठोकल्या होत्या.
- भारताने 207 धावांचे लक्ष्य अगदी सहजपणे 31 व्या षटकातच पूर्ण केले होते. त्यामुळे भारताने मालिकेत 3-0 ची विजयी आघाडी घेतली होती.
- भारताकडून शिखर धवन आणि आजिंक्य राहाणेने इंग्लंडच्या गोलंदांची धुलाई करत भारताला विजयाच्या शिखरापर्यंत पोहोचवले होते.
- राहाणेने 100 चेंडूंमध्ये 106 धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता.
- धवनने नाबात 97 धावांची खेळी केली होती. राहाणे बाद झाल्यानंतर धवन आणि कोहलीने सहज विजय मिळवला होता.
- त्याचबरोबर भारताने इंग्लंडच्या भूमीवर 24 वर्षांनंतर वन डे सिरीजमध्ये विजय मिळवला होता. त्यापूर्वी भारताने 1990 मध्ये
वनडे सीरीजमध्ये विजय मिळवला होता.