आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71. अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी ते समलैंगिक असल्याचे जाहीर केले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगविख्यात कंपनी अ‍ॅपलचे प्रमुख टिम कूक यांनी आपण समलैंगिक असून त्याबाबत गर्व असल्याचे जाहीर केले.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (71 वर यासाठी)
स्टीव्ह जॉब्स यांचे उत्तराधिकारी टिम कूक यांचे समलैंगिक असल्याचे मान्य करणे हे आश्चर्यकारक आहे. टिम यांनी एका लेखात लिहिले होते की, अ‍ॅपलचे सीईओ समलैंगिक असल्याचे समजल्यानंतर एखाद्याला दिलासा अथवा प्रेरणा मिळाल्यास त्यामुळे माझ्या कोणत्याही वैयक्तीक अधिकाराचे हनन होत नाही.
फॅक्ट फाइल
- 1 नोव्हेंबर 1960 ला रॉबर्ट्स डेल, अलबामा येथे जन्मलेले टिम कूक यांचे पूर्ण नाव टिमोथी डोनाल्ड कूक आहे. ब्लूम्बर्ग बिझनेसवीक मधील एका लेखात कूक यांनी स्पष्टपणे लिहिले होते की, 'मला समलैंगिक असण्यावर गर्व आहे आणि देवाकडून मिळालेल्या सर्वोत्कृष्ट बक्षिसांपैकी हे एक आहे असे मला वाटते.'

- टिम कूक यांनी स्पष्ट केले की, समलैंगिक असण्याचे जाहीर करून त्यांना ओळखीसाठी झगडणार्‍यांची मदत करायची आहे.

- कूक यांनी सांगितले की, ते याबाबत आधीही अनेकदा बोलले होते, पण त्याचबरोबर याबाबत काही प्रमाणात खासगी बाबी लपवल्याचेही त्यांनी मान्य केले.

- स्वतःला या मुद्याचा मोठा कार्यकर्ता वगैरे समजत नसल्याचेही कूक यांनी स्पष्ट केले. पण इतरांच्या त्यागामुळे लाभ मिळाल्याची जाणीव असल्याचे ते म्हणाले.

- मूलभूत अधिकारांसाठी लढणार्‍या मार्टिन ल्यूथर किंग यांचा उल्लेख करताना ते म्हणतात की, तुम्ही इतरांसाठी काय करता? हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो?