आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

99. अ‍ॅपलने भारतात विकले 10 लाख आयफोन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट जगतातील नामांकित अग्रगण्‍य कंपनी अ‍ॅपलने ऑक्‍टोबर 2013 पासून सप्‍टेंबर 2014 पर्यंत भारतात 10 लाखाहून अधिक आयफोन विकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (99 वर यासाठी)
कारणः अ‍ॅपलचे महागडे फोन भारतात यावेळी प्रथम विकल्‍या गेले. यापूर्वी अ‍ॅपल ही कंपनी भारताला चांगली बाजारपेठ मानतच नव्‍हती.
फॅक्‍ट फाइल:
_ काउंटर प्वाइंट संशोधनाच्‍या अहवालानूसार, नवीन युजर्स स्‍मार्टफोनच्‍या बाबतीत किमतीला प्राधान्‍य न देता स्‍टेट्स मेंटेन करण्‍यासाठी महागडे स्‍मार्टफोन्‍स घेतात.

_ अ‍ॅपलच्‍या फोनला चांगल्‍या नेविगेशनसोबतच चांगली बॅटरी, कॅमेरा आणि ग्राफिक्‍स दिले आहे. त्‍यामुळे युजर्सला खरोख्‍ारच चांगला अनुभव आला आहे.

_ दहा लाख आयफोन विकत अ‍ॅपलने चांगला नफा मिळविला. भारतीय बाजारपेठांमध्‍ये सर्वोत्‍तम नफा मिळविणारी कंपनी बनली.

_ आयफोन 4S 8GB चा भारतात एकूण 26.9 टक्‍के सहभाग आहे.

_ 40,000 रुपयांचा आयफोन 5C 16GB 11 महीन्‍यांमध्‍ये 10 टक्‍के विकल्‍या गेला.

_ आयफोन 4S 8GB 19,500 रुपये आणि 5C 16GB भारतात 33,500 रुपयांपर्यंत मिळत आहे.

_ कोरियन कंपनी सॅमसंगच्‍या स्मार्टफोनची बाजारात 25.1 टक्‍के भागीदारी आहे.

_ यानंतर 20.4 टक्‍के भागीदारी मायक्रोमॅक्स (दूस-या स्‍थानी), कार्बन 9.6 टक्‍के(तिस-या स्‍थानी), मोटोरोला 4.7 टक्यांसह (चौथ्‍या स्‍थानी) आणि सोनी 4.5 टक्‍यासह पाचव्‍या स्‍थानी आहे.

_ बाजारपेठेतील भागीदारीमध्‍ये अ‍ॅपल भारतात सहाव्‍या स्‍थानी आहे. जूनपर्यंत त्‍याची बाजारपेठेतील भागीदारी 5.5 टक्‍के होती.