आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

62. नितीशकुमारांचा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (62 वर यासाठी)
लोकसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त)चा मोठा पराभव झाला. याची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाचे नेते नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र नंतर त्यांच्या राजीनामा देण्याचे कारण उघड झाले. विखुरलेला जनता परिवार एकत्र आणण्यासाठीची त्यांची ही रणनीती असल्याचे समोर आले.

फॅक्ट फाइलः
- 16 व्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वात जनता दल (संयुक्त)ला फक्त दोन जागांवर यश मिळाले. त्यांच्या 24 उमेदवारांची अनामत रक्कम देखील जप्त झाली.

- निवडणूक निकालाच्या दिवशी (16 मे 2014) सुरुवातीला नितीशकुमार माध्यमांसमोर आले नाही.

- दुपारी तीन वाजतानंतर मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवनातून मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या राजीनाम्याची बातमी येऊ लागली.

- सायंकाळी चार वाजता अचानक नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येऊन ठेपले. त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेला संबोधित करताना राजीनाम्याची घोषणा केली.

- पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत आमदारांनी पुन्हा त्यांचीच विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली. मात्र त्यांनी त्यास साफ नकार देत पुन्हा मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. पुढील निवडणुकीनंतर त्याबाबत विचार करु असे त्यांनी सांगितले.

- तीन दिवस चालेल्या मंथनानंतर बिहारला मुसहर जातीचे दलित जीतनराम मांझी मुख्यमंत्री म्हणून लाभले.

- नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदींना भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले गेले तेव्हापासूनच भाजपसोबतचे नाते तोडले होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोदींविरोधात मोर्चा उघडला.

- नितीशकुमार यांना विश्वास होता, की बिहारमध्ये जनता दल (संयुक्त)ला सन्मानजनक जागा मिळतील. त्या आधारावर ते मोदींना केलेल्या विरोधाच्या निर्णयाचा बचाव करु शकतील. मात्र, तसे झाले नाही आणि पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

- पक्षात आणि राज्यात आपली प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी अखेर राजीनामा दिला.