आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar CM Manjhi Says Both Controversial Remark Last Yerars

84. बिहारचे मुख्यमंत्री मांझीचे उलट-सुलट, मात्र गंमतीशीर वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारचे महादलित मुख्यमंत्री जितनराम मांझी मागील 7 महिन्यांपासून उलट-सुलट वक्तव्य करून चर्चेत आहेत. मांझी म्हणतात, मी कोणासमोरही झुकणार नाही.

डीबी टेक - नंबर 84 वर यामुळे
जितनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री करून नितीशकुमार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला परंतु सरत्या काळासोबत मांझी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण करत आहेत.

फॅक्ट फाइलः
मांझींनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेले काही वादग्रस्त-गमतीशीर वक्तव्य

- वीज बिलामध्ये तडजोड करण्यासाठी पाचहजार रुपयंची लाच दिल्याचे मांझी यांनी कबूल केले होते.

- सरकार कमी प्रमाणात काळाबाजार करणार्‍या लोकांना दंडित करणार नाही.

- नितीशकुमार यांनी काम केले परंतु राज्यातील भ्रष्टाचारावर काहीच फरक पडला नाही.

- गरीबांचा उपचार न करणार्‍या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत.

- उंदीर मारून खाणे वाईट नाही, मी पण उंदीर खात होतो. विशेष म्हणजे आजही उंदीर मिळाला तर मी सोडणार नाही.

- महादलित कुटुंबात वाढल्यामुळे मी लहानपणापासूनच ठोकर खात आहे. ठोकर खात-खातच मुख्यमंत्री झालो, एखद्या वेळेस हीच ठोकर मला पंतप्रधान करेल.

- कॉलेजच्या दिवसांमध्ये माझ्याकडे एक पायजमा, एक हाफ शर्ट, एक बनियन आणि एक लुंगी होती. हे सर्व कपडे सहा दिवस घालत होतो आणि शनिवारी धुवून वाळू घालायचो.

- माझा अभ्यास आणि साधेपणामुळे कॉलेजमधील मुली माझ्यावर जीव ओवाळून टाकत होत्या आणि शिकवणीसाठी येत होत्या.

- बिहारचे तरुण कामाच्या शोधात राज्याच्या बाहेर जातात आणि वर्षानंतर परत येतात. तुमची पत्नी येथे घरी काय करते, ही विचार करण्याची गोष्ट आहे.

- मी तर नितीशकुमारांचा हनुमान आहे, ज्यादिवशी सांगतील त्यादिवशी राजीनामा देईल. नितीशकुमार आणि माझ्याबद्दल मीडिया विनाकारण गोंधळ निर्माण करत आहे.

- मी मुहसर जातीचा आहे आणि मीपण खूप दारू पीत होतो. काही काळानंतर दारू सोडली यामुळे आज मुख्यमंत्री आहे.

- एखादा दलित दिवसभर काम करून रात्री घरी येउन जेवण केल्यानंतर थोडीशी दारू पीत असेल तर मी याला चुकीचे मनात नाही.