आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP MP Giriraj Singh Now Says All Cash His Cousin’s

70. स्वत:च्या घरात कोट्यवधींची चोरी केल्याने गिरिराज सिंह अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारमधील नवादाचे भाजपचे खासदार गिरिराज हे स्वत:च्या घरात चोरी झाल्याने अडचणीत सापडले होते. गिरीराज यांच्या पाटणा येथील एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. परंतु पोलिसांनी एक कोटी 14 लाख रुपये आणि 600 अमेरिकन डॉलर्स सापडले होते. यामुळे गिरीराज वादाच्या भोवर्‍यात सापडले सापडले होते.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज
गिरिराज यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात मालमत्तेची घोषणा केली होती. दीड लाख रुपये रोख व सोन्याचे दागिने असल्याचे गिरीराज यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या विवरण पत्रात म्हटले होते. मात्र, पोलिसांना सापडलेला कोट्यवधींचा ऐवज आपल्या नातेवाईकाचा असल्याचे सांगत गिरीराज यांनी सारवासारव केली होती.

फॅक्ट फाइलः
*9 जुलै 2014 रोजी दुपारी पाटणा येथील आनंदपुरी भागात असलेल्या शिवम अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये चोरी झाली. खासदार गिरिराज सिंह यांचा हा फ्लॅट आहे. 10 जुलैला दुपारी अडीच वाजता पत्रकार परिषद घेऊन एसएसपी मनु महाराज यांनी चोरांना पकडल्याचा गौप्यस्फोट केला. एका रिक्षातून एक कोटी 14 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने आणि अमेरिकन डॉलर घेऊन जाताना पोलिसांनी चार आरोपींना अटक केले होते.

*खासदारांचा सरकारी अंगरक्षक कमल, घरातील नोकर लक्ष्मण, अपार्टमेंटचा खासगी सुरक्षारक्षक वीरेंद्र आणि त्याचा मित्र दिनेश अशा चौघांना ऐवजसह पोलिसांना अटक केले होते. इतका मोठा ऐवज सापडल्याची माहिती पोलिसांनी प्राप्तीकर विभागालाही दिली होती.

*चोरट्याकडे सापडलेला कोट्यवधींचा ऐवज आपला चुलत भाऊ राकेश सिंह यांचा असल्याचे गिरीराज सिंह यांनी सांगितले. राकेश सिंह हे महाराष्ट्रातील नागपूर येथे रिअल इस्टेटचा बिझनेस आहे.

*बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष जदयू, राजद आणि कॉंग्रेसने विधिमंडळात जोरदार गदारोळ केला होता. खासदार गिरिराज सिंह यांच्या घरात आढळलेला ऐवज काळा पैसा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरीराज सिंह यांच्यावर कारवाई न करता त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात गिरिराज सिंह यांच्याकडे उद्योग राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे.