आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

92. भारतीय बॉक्सर सरिता देवीने नाकारले मेडल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन एशियन गेम्समध्ये पहिला क्रमांक न मिळाल्याने भारतीय बॉक्सर सरिता देवीने कांस्य पदक परत केले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघाने (आयबा) सरिताला निलंबित केले होते.
डीबी टेक- नॉलेज पॅकेज (92 वर यासाठी)
कारण- आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या गौरव समारंभात ही विचित्र घटना घडली होती. यामुळे सरिता देवीवर आजन्म बंदी घातली जाण्याची शक्यता होती. पण आज तिला दिलासा मिळाला आहे.
फॅक्ट फाइल
- आशियायी खेळांच्या बॉक्सिंग स्पर्धेत 60 किलोग्रॅंम वर्गातील सेमिफायनलमध्ये सरिता देवीला दक्षिण कोरियाची खेळाडू पार्क जीनाने हरवले होते. परंतु, या स्पर्धेत सरिता देवीचे पारडे जड दिसत होते.

- इंचियोनमध्ये पोडियम सेरेमनीदरम्यान सरिता देवीने रडत आपला पुरस्कार घेतला. त्यानंतरही ती खुप रडत होती. तिला निलंबित करण्यात आल्याने विश्व चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यापासून ती वंचित राहिली.

- सरिताच्या वागणुकीने संतप्त झालेल्या संघाने त्यांचे कोच गुरबख्श संधू, सागर दयाल आणि ब्लेक्स फर्नांडिस यांनाही पुढील निर्णय होईपर्यंत प्रतिबंध लावला होता.

- यावेळी तिने म्हटले होते, की माझ्या मनात जे दुःख आहे. त्याला मला कोरियातच सोडायचे आहे. माझ्यासोबत जे काही झाले ते ठिक नव्हते.

- आयबाच्या टेक्निकल टिमचे डेव्हिस फ्रांसिस यांनी सांगितले, की ही सगळी घटना सरिता आणि तिच्या टिमची नियोजित होती.

- केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनेवाल यांनी आयबाचे अध्यक्ष चिंग कूओ वूसोबत सरिताची मेहनत आणि कौटुंबिक पार्श्वभूमिला बघता प्रतिबंध मागे घेण्याची विनंती केली होती.

- सचिन तेंडुलकरने सरिताचे समर्थन करीत तिला मानसिक आधार देण्याचे आवाहन भारतीयांना केले होते.

- आयबाने अद्याप तिला कोणतीही शिक्षा सुनावलेली नाही. पण तिचे करिअर जवळपास संपुष्ठात आले असल्याचे सांगितले जात आहे.