आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

91. लालू प्रसाद यादव- मुलायमसिंह यादव अडकले नात्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलायमसिंह यादव यांचा नातू प्रतापसिंह आणि लालू प्रसाद यादव यांची मोठी मुलगी राजलक्ष्मी यांचे लग्न जुळले आहे.
डीबी टेक- नॉलेज पॅकेज (91 वर यासाठी)
कारण- जेपी यांचे शिष्य आणि देशातील राजकारणाचे दोन दिग्गज आता नातलग झाले आहेत. जनता दलाचे तुकडे एकत्र जोडण्याच्या मिशनमध्ये नवीन नाते विशेष भूमिका बजावणार असल्याचे दिसून येते.
फॅक्ट फाइल
- तेज प्रतापचा जन्म सैफईमध्ये मुलायमसिंह यादव यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय रणवीरसिंह यादव आणि मृदुला यादव यांच्या घरी 21 नोव्हेंबर 1987 रोजी झाला.

- तेज प्रतापसिंह यादव मैनपुरी येथून लोकसभेत गेले आहेत. या जागेवर यापूर्वी मुलायमसिंह यादव निवडणूक लढले होते. त्यांनीच ही जागा तेजप्रतापसिंह यांना दिली.

- 1990 मध्ये जन्म झालेली राजलक्ष्मी लालू यादव आणि राबडी देवी यांच्या नऊ आपत्यांपैकी सर्वांत लहान आहे.

- लखनऊ येथील ५, विक्रमादित्य मार्गावरील मुलायमसिंह यांच्या घरी रविवारी 7 डिसेंबर रोजी लालू यादव शगून घेऊन गेले होते.

- मुलायम म्हणाले, की लालूंसोबत गेल्या काही वर्षांपासून जवळचे नाते राहिले आहे. मध्यंतरी आम्ही वेगवेगळे झालो होतो. पण आता एक आहोत.

- लालू यादव यांनी सांगितले, की या कौटुंबीक नात्याने नवीन राजकीय आघाडीला बळकटी मिळाली आहे.

- लग्नाच्या तारखेवर लालू म्हणाले, की आम्ही यादव आहोत. पंडितजी लग्नाची तारिख सांगतील. जी तारीख ते सांगतील तेव्हाच लग्न होईल.

- 1990 च्या दशकात मंडल आयोगामुळे मुलायम आणि लालू यांचे मार्ग वेगळे झाले होते. 1997 मध्ये तिसऱ्या आघाडीच्या सरकारच्या काळात मुलायमसिंह यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. पण तेव्हा लालू यादव यांनी त्यांना विरोध केला होता.