आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Said That, I Have To Be Women. I Brest, You Have Some Problem In My Cleavage?

89. दीपिकाचा राग, ‘हो मी महिला आहे.... तुम्हाला काही प्रॉब्लम‘?’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपतात ‘क्लीवेज‘ दाखवणारा फोटो आणि बातमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणने ट्विटरवर प्रतिउत्तर दिल्यामुळे वादाला तोंड फुटले.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (89 वर यासाठी)
असे पहिल्यांदा झाले आहे की, दीपिकाच्या रूपाने एखाद्या अभिनेत्रीने लिखित स्वरूपात ते पण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून एखाद्या गोष्टीवर इतक्या कडक शब्दात प्रतिक्रिया दिली.
फॅक्ट फाइलः
सप्टेंबर महिन्यात एका इंग्रजी वृत्तपत्राने दीपिका पादुकोणवर असलेल्या एका बातमीची लिंक ट्विटरवर शेअर करत लिहिले होते की, ‘ओएमजी (ओह माय गॉड), दीपिका पादुकोणचा क्लीवेज शो.
यानंतर दीपिकाने या पोस्टचा स्क्रीनशॉट घेवून त्याला प्रतिउत्तर देत ट्विटरवर लिहिले की, ‘हो मी महिला आहे. मला ब्रेस्ट आहे, माझी क्लीवेज आहे तुम्हाला काही प्रॉब्लम?’
आणखी एका ट्वीटमध्ये तिने लिहिले की, तुम्हाला महिलांची प्रतिष्ठा कशी राखतात हे माहित नाही. त्यामुळे महिला सबलिकरणावर तुम्ही बोलू नका.
दीपिका म्हणाली, आम्ही वास्तविक आयुष्य आणि चित्रपट यांच्यातील रेष मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही एक वर्षापूर्वी घडलेली गोष्ट एखाद्या बातमीप्रमाणे सादर करून तुमचे सर्व प्रयत्न खराब करत आहात.
दीपिकाने फेसबुकवर ‘माय प्वॉइंट ऑफ व्यू‘ नावाने टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये बेधडक लिहिले की, एक महिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तयार आहे याचा केवळ एकच इशारा आहे जेव्हा ती ‘हो‘ म्हणेल. दरम्यान दीपिकाची नाराजी आणि कडक शब्दातील टिप्पणी ट्विटरवर देखील ट्रेंडमध्ये राहिली होती. या प्रकरणावर अनेक दिग्ग्जांनी दीपिकाला पाठिंबा दिला.
यानंतर इंग्रजी वृत्तपत्रातर्फे ट्विट करण्यात आले, दीपिका, आम्ही तुमचे कौतुक करत होतो, तुम्ही खुप सुंदर आहात हे सगळ्यांना कळावे हिच आमची इच्छा आहे.
या प्रकरणावर शाहरुख खानने दीपिका खुप साहसी आहे असे म्हणत समर्थन केले होते.
हर्षा भोगले यांनी लिहिले होते की, मी या प्रकरणात पुर्णपणे दीपिकाच्या बाजूने आहे.
अरविंद केजरीवाल यांनी देखील इंग्रजी वृत्तपत्रवर जोरदार टिका केली होती.