आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Minister Laxmikant Sharma Arrested In Madhya Pradesh Board Scam

मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशातील बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) आणि भर्ती घोटाळ्याप्रकरणी माजी पूर्व मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांना एसटीएफने अटक केले आहे. दरम्यान, कोर्टाने लक्ष्मीकांत शर्मा यांच्या जामीन याचिकेवर 8 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज
व्यावसायिक परीक्षा मंडळ आणि भर्ती घोटाळ्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचीही डोकेदुखी वाढवली होती.

फॅक्ट फाइलः
*मध्य प्रदेशचे दिग्गज मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांना एसटीएफने गेल्या जून महिन्यात भोपाळ येथील त्यांच्या राहात्या घरातून अटक केले. माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा यांनी सलग 10 वर्षे त्यांनी राज्यातील विविध विभागांचा कार्यभार सांभाळला आहे.

*2012 साली झालेल्या पोलिस भर्ती परीक्षेत लक्ष्मीकांत शर्मा यांनी आपल्या ओएसडी ओ.पी.शुक्ला यांच्या मदतीने सात उमेदवारांना उत्तीर्ण केले होते. तसेच शिक्षक भर्ती आणि दुग्ध संघ भर्तीमध्येही गैरव्यवहार केल्याचा शर्मांवर आरोप आहे.

*52 वर्षीय लक्ष्मीकांत शर्मा हे एकेकाळी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते. शर्मा याचे मध्य प्रदेशातील राजकारण किती वजन आहे, याचा आपल्याला अंदाज येतो.

*लक्ष्मीकांत शर्मा यांनी 2003 ते 2013 या 10 वर्षांच्या काळात खाण मंत्री ते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रिपद भूषवले.

*मध्य प्रदेशातील सिरोंजमध्ये सुरुवातीला पुजारी नंतर शिक्षक म्हणून नोकरी केलेल्या शर्मांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खुप जवळचा संबंध आहे.

*लक्ष्मीकांत शर्मा हे 1993 मध्ये सिरोंजचे आमदार म्हणून निवडणूक आले. 2003 मध्ये उमा भारती सरकारमध्ये खाण मंत्री, बाबूलाल गौर आणि शिवराज सिंह सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते.

*उमा भारती सरकारमध्ये लक्ष्मीकांत शर्मा यांचे नाव खाण घोटाळ्यातही समोर आले होते. मोठ्या लोकांना वाचवण्यासाठी आपण स्वत:चा बळी देत असल्याचे शर्मा यांनी म्हटले होते.