आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

94. ग्राहकांवर छाप पाडू शकला नाही गुगलचा अॅंड्राईड वन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्त, युजर फ्रेंडली आणि भारतीय भाषांसाठी अनुकूल गुगुलचा अॅंड्राईड वन भारतात लॉंच झाला. पण युजर्सच्या पसंतीला उतरला नाही.

डीबी टेक- नॉलेज पॅकेज (94 वर यासाठी)
कारण- गुगलच्या अॅंड्राईड फोनने स्मार्टफोनचे जग बदलून जाईल, असा दावा करण्यात आला होता. पण तसे काहीच झाले नाही.
फॅक्ट फाईल
- अॅंड्राईड वन गुगलचा असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या उद्देश स्वस्त आणि चांगला स्मार्टफोन बनवणे होता. याचे विशेष फिचर्स गुगलने निश्चित केले होते.

- याच्या मार्केटिंगवर तब्बल 100 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मीडियाच्या सर्व स्वरुपांवर जोरदार मार्केटिंग करण्यात आले होते. पण अखेर अपयश आले.

- मायक्रोमॅक्स आणि कार्बन या सारख्या भारतीय कंपन्या अॅंड्राईड वनवर आधारित स्मार्टफोन तयार करत आहेत. त्यांची किंमत सहा हजार रुपयांच्या घरात असेल. यात गुगलच्या फोनचे सर्व फिचर्स इनबिल्ड राहतील.

- अॅंड्राईड वनमध्ये भारतातील शहरे आणि गावांचा विचार करुन तशा स्वरुपाचे फिचर्स ठेवण्यात आले होते. हिंदीसह इतरही भारतीय भाषांना हा फोन सपोर्ट करतो.

- चीनमधून प्रीमियम रेंजचे स्मार्टफोन भारतात येत आहेत. त्यांना बॅटरी बॅकअप, चांगला कॅमेरा असून किंमतही सात ते वीस हजारांच्या रेंजमध्ये आहे. याचा फटका अॅंड्राईड वनला बसला आहे.

- स्मार्टफोन मार्केटमध्ये अॅंड्राईड फोनची भागीदारी 85 टक्के, अॅपलची हिस्सेदारी 12 टक्के तर विंडोजचा सहभाग 3 टक्के आहे.

- आयडीसीच्या आकड्यांनुसार भारतात स्मार्टफोनच्या विक्रीत 186 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यातील जवळपास 78 टक्के फोन 12,000 रुपयांपेक्षा कमी बजेटचे आहेत.

- भारतात सध्या फोनच्या हार्डवेअरला जास्त महत्त्व दिले जाते. पण अॅंड्राईड फोनचा भर सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टिमवर होता.