आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hafiz Saeed & Ved Pratap Vaidik's Meet In Pakistan Shocks House

56. दहशतवादी हाफिज सईदची डॉ. वैदिक यांनी घेतली मुलाखत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेष्‍ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी पाकिस्तान दौ-यावर जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदची मुलाखत घेतली.

डीबी टेक - नंबर 56 वर यासाठी:
वैदप्रताप वैदिक यांना जगभर ओळखल्‍या जाते. बाबा रामदेव यांचे स्‍नेही म्‍हणूनही त्‍यांची ओळख होते. त्‍यांची मुलाखत देशभर चांगलीच चर्चाच झाली होती.

फॅक्‍ट फाइलः
- जुलै महिन्‍यात वेदप्रताप वैदिक पूर्व केन्द्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांच्‍या प्रतिनिधी मंडळाचे सदस्‍य म्‍हणून पाकिस्‍तान दौ-यावर गेले होते.

- कार्यक्रम समाप्त झाल्‍यानंतर सलमान खुर्शीद, मणिशंकर अय्यर तसेच अन्‍य शिष्‍टमंडळ भारतात परतले होते. मात्र वैदिक आले नव्‍हते.

- त्‍यांनी पाकिस्तानी पत्रकारासोबत चर्चा केल्‍यानंतर हापिज सईदशी संवाद साधला होता.

- ही मुलाखत 2 जुलै रोजी हाफिज सईदच्‍या घरी पार पडली. वैदिक यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार हाफिजचे मतपरिवर्तन झाले असून त्‍याचा मोदी आणि भारतद्वेष कमी झाला आहे.

- हाफिजला पकडण्‍यासाठी अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षिस जाहीर केले होते.

- हाफिजच्‍या जमात उद दावा या संघटनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, भारत, अमेरिका, यूरोपीय संघ, रशिया, ब्रिटेन आणि ऑस्ट्रेलिया यांनी द‍हशवादी संघटन म्‍हणून घोषित केले.

- मुंबईमध्‍ये झालेल्‍या 26/11 हल्‍ल्‍यामध्‍ये हाफिजचा हात होता.

- अशा व्‍यक्‍तीला भेटण्‍याचा उद्देश काय म्‍हणून त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उठली होती.

- भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेने वेदप्रताप वैदिक यांच्‍यावर देशद्रोहाचा आरोप केला होता.

- वेदप्रताप वैदिकने या आरोपाचे खंडन केले होते.