आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

97. \'हॅप्पी न्यू ईयर\' हा बकवास सिनेमा- जया बच्चन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ या सिनेमाने जरी आतापर्यंत 300 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना हा सिनेमा अजिबात आवडला नाही. गेल्या काही वर्षातील हा बकावास सिनेमा असल्याचे जया बच्चन म्हणाल्या होत्या.
मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान जया बच्चन यांनी हे वक्तव्य केले होते. 'हॅप्पी न्यू ईयर' हा अतिशय बकवास सिनेमा आहे. हे मी चित्रपटातील कलाकारांनाही सांगितले. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

डीबी टेक - नॉलेज पॅकेज (97 वर यासाठी)
विशेष म्हणजे 'हॅप्पी न्यू ईयर'मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन प्रमुख भुमिकेत आहे. तरी देखील जया बच्चन यांनी सिनेमाला 'बकवास' म्हणून मोठया वादाला तोंड फोडले होते.
फॅक्ट फाइल:
- मुंबईत आयोजित लिटरेचर फेस्टिव्हलदरम्यान, 'The failure of literature in informing current cinema' या विषयावर चर्चा करताना जया बच्चन यांनी 'हॅप्पी न्यू ईयर'बाबत हे वक्तव्य केले होते.

- जया म्हणाल्या, ‘हॅपी न्यू ईयर’ अतिशय बकवास सिनेमा आहे. हे मी चित्रपटातील कलाकारांनाही सांगितले. मी फक्त अभिषेक या सिनेमात आहे म्हणूनच हा चित्रपट पाहिला.
- 'मी अभिषेकला सांगितले, जर तू कॅमेर्‍यासमोर अशी मूर्ख भूमिका साकारू शकतो, म्हणजे तू खरोखरच महान अभिनेता आहेस', असेही उपाहासात्मक वक्तव्य जया यांनी केले होते.

- शाहरुख खानचा सिनेमा 'हॅप्पी न्यू ईयर'ने बॉक्स ऑफिसवर 300 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे.
- जया बच्चन यांच्या वक्तव्यामुळे शाहरुख खान नाराज झाला होता. अखेर याप्रकरणी महानायक अमिताभ बच्चन यांना मध्यस्थी करावी लागली होती. अमिताभ यांनी शाहरुखला मेसेज पाठवून जया यांच्याकडून माफी मागितली होती.