आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100. जगभरात आइस बकेट चॅलेंजचा चांगलाच बोलबाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्‍या 'एएलएस' फाउंडेशनने डोक्‍याच्‍या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्‍यासाठी हे अभियान सुरु केले. हे चॅलेंज जगभर चांगलेच गाजले.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (100 वर यासाठी )
कारण :
सोशल माध्‍यमांच्‍या माध्यमातून या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली. उल्‍लेखनिय बाब म्‍हणजे सेलेब्रिटीजने या अभियानात मोठ्या संख्‍येने सहभाग घेतला.
फॅक्ट फाइल:
-जागरुकता आणि परोपकारीवृत्‍ती जागृत करण्‍यासाठी आईस बकेट चॅलेंजचे महत्‍वाचे योगदान ठरले. सोशल साइटचा उपयोग करुन ‘एएलएस/एमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस‘ या आजाराविषयी जागरुकता करण्‍यात आली.
-एएलएस हा डोक्‍याचा आजार आहे. या आजाराने पाठीचा मणका कमकुवत होतो. प्रत्‍येक 90 मिनिटाला एक व्‍यक्‍ती प्रमाणे लोक आजारी पडत आहेत.

-या अभियानात लोक डोक्‍यावर बर्फाच्‍या पाण्‍याची बादली ओततात. शिवाय आपल्‍या तीन मित्रांना हे पाणी डोक्‍यावर घेण्‍याचे आवाहन करतात.

-आवाहन केलेल्‍या मित्रांना 24 तासाच्‍या आत हे पूर्ण करावे लागते.

-जर त्‍यांनी 24 तासाच्‍या आत हे आवाहन पुर्ण केले नाही तर त्‍यांना 100 डॉलर रुपयांची मदत 'एएलएस'ग्रस्‍त लोकांना द्यावी लागते.

-आईस बकेट चॅलेंजला बॉलिवूड सेलिब्रिटीपासून ते देश विदेशातील व्‍यक्‍तींनी चांगला प्रतिसाद दिला.

-बिल गेट्स, मार्क जुकरबर्ग, बराक ओबामा आदी विदेशी व्‍यक्‍तींनी सर्वप्रथम याचा स्विकार केला. भारतात सानिया मिर्झाने सर्वप्रथम हे आवाहन स्विकारले.

-रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, सनी लियोनी, बिपाशा बसु, ट्विंकल खन्ना, सलमान खान, जॉनी लीवर, शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, युवराज सिंह, अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुट्टा आदी दिग्‍गजांनी हे आवाहन स्विकारले.

अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष जॉर्ज बुश यांनी बिल क्लिंटनच्‍या डोक्‍यावर थंड पाणी टाकून आवाहन केले होते. आपल्‍या वाढदिवसाची गिप्‍ट संबोधले होते.