आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Imran And Tahir Ul Qadri Laid Siege To The Parliament Of Pakistan

76 पाकिस्तान संसदेवर इम्रान आणि कादरींनी घातला घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ विरोधात निवडणूकीत गोँधळ केल्याच्या आरोपामध्ये इमरान खान आणि ताहिरूल कादरी यांनी 14 ऑगस्टला देशव्यापी आंदोलन सुरू केले आणि संसदेला घेराव घातला होता.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (76 वर यासाठी)
या आंदोलनामुळे पुन्हा एकदा हे सिध्द झाले आहे की, पाकिस्तान एक अशांत देश आहे जेथे बहूमताने निवडणून आलेल्या सरकारचे काडीमात्र चालत नाही. कधी सैन्य वरचढ होते तर कधी कट्टरपंथी आणि कधीकधी दोघेही मिळून लोकशाहीची खिल्ली उडवतात.
•नवाज शरीफ यांची झोप उडवणाऱ्या आंदोलनाचे नायक इम्रान खान आणि त्यांची पाकिस्तान तहरीकए-इंसाफ पार्टीला (पीटीआई) कॅनाडावरून पाकिस्तानला परतलेले धार्मिक नेते पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी)चे ताहिरुल कादरी हे साथ देत आहेत.
•आंदोलनकर्त्यांनी 2013 मध्ये झालेल्या निवडणूकीतील गोंधळावरून नवाज शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. पहिल्या टप्प्यात इस्लामाबादमध्ये ऑगस्टमध्ये झालेले उपोषण जवळपास दोन महिन्यांपर्यंत सुरू होते.
•संसदेच्या घेरावामध्ये आंदोलक रेड झोनमध्ये पोहोचले होते. या भागात संसद भवन, पंतप्रधान, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय, दूतावास समवेत अनेक महत्त्वाच्या इमारती होत्या.
•सरकारच्या एका गटाने इम्रान यांची भेट घेतली, मात्र दोन्ही पक्ष शरीफ यांच्या राजीनाम्याचा मुद्दा सोडवण्यास अपयशी राहिले.
•इमरान-कादरीने इस्लामाबादमध्ये त्यांचे आंदोलन संपवले होते, मात्र डिसेंबवरमध्ये नव्हा पध्दतीने उपोषण आणि आंदोलन करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका इम्रान यांनी मांडली आहे.
•२५ डिसेंबरपासून सरकारविरोधात नव्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. त्यांनी देशातील इतरही मोठ्या शहरांना एक-एक करत बंद करण्यात येईल असे सांगितले आहे.
•अडचणीत सापडलेले पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले की, मी राजीनामा देणार नाही आणि सुट्टीवरही जाणार नाही. काही बोटावर मोजण्याइतके लोक जनादेश धुडकाळून लावतील या प्रकराची परंपरा बनू देणार नाही.
•पाकिस्तानमध्य निवडणूकी आगोदर ब्रिटीश काऊंसिलच्या एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तानचा 71 टक्के युवक पाकिस्तान सरकार, तर 67 टक्के राष्ट्रीय संसद आणि 69 टक्के राजकीय पक्ष यांच्यावर विश्वास ठेवत नाही. तर 74 टक्के युवक धार्मिक व्यवस्था म्हणजेच शरिया आणि 77 टक्के सैन्याचा समर्थक आहे.